Ambegaon Leopard Captured: शिंगवे गावठाणात तीन आठवड्यांनंतर बिबट मादी जेरबंद

आंबेगाव तालुक्यात भीतीचे वातावरण; बछडे असल्याची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Leopard Capture
Leopard CapturePudhari
Published on
Updated on

पारगाव : आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावठाण परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बिबट्यांचा वावर होता. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाला तब्बल तीन आठवड्यांच्या प्रयत्नानंतर बिबट मादीला जेरबंद करण्यात यश मिळाले.

Leopard Capture
Jejuri Janai Devi Yatra: जेजुरीत दीडशे वर्षांनंतर ग्रामदैवता जानाई देवीची जत्रा साजरी

जेरबंद केलेल्या बिबट मादीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी तिला जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले. या परिसरात अजूनही बिबट्यांचे बछडे असण्याची शक्यता असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी एकटे बाहेर जाणे टाळावे, लहान मुलांना बाहेर सोडू नये,

Leopard Capture
Morgaon Mayureshwar Temple Yatra: मोरगावच्या श्री मयूरेश्वर मंदिरात माघी गणेश जयंती द्वारयात्रेला प्रारंभ

तसेच पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, असे आवाहन मंचर वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांनी केले आहे. बिबट्याचा किंवा त्याच्या बछड्यांचा वावर दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचेही आवाहन वन परिमंडल अधिकारी आर. एम. फुलमाळी, वनरक्षक बी. एच. पोतरे, दत्ता राजगुरव यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news