Ambadwet Panchayat Samiti Election: अंबडवेट गणात प्रवीण धनवे विजयी; संतोष पेरणेकर ठरले ‘किंगमेकर’

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा विजय; 1,776 मतांनी धनवे यांचा दणदणीत पराभवावर मात
Ambadwet Panchayat Samiti Election
Ambadwet Panchayat Samiti ElectionPudhari
Published on
Updated on

पौड : अंबडवेट (ता. मुळशी) पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग््रेासचे उमेदवार प्रवीण धनवे विजयी झाले असून, त्यांना पाठिंबा देणारे संतोष पेरणेकर हे या विजयात किंगमेकर ठरले आहेत.

Ambadwet Panchayat Samiti Election
Rashtrabhakti Sahitya Sammelan Pune: आठवे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन 21-22 फेब्रुवारीला; प्रा. यास्मिन शेख व डॉ. अविनाश चाफेकर यांना जीवनगौरव

अंबडवेट गणात राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाकडून जनकल्याण युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पेरणेकर, दारवलीचे माजी उपसरपंच प्रवीण धनवे यांच्यासह सात ते आठ जण निवडणूक लढवण्यासाठी तीव इच्छूक होते; मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संतोष पेरणेकर यांनी प्रवीण धनवे यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. यामुळे दोन तीव इच्छुक एकत्र आल्याने प्रवीण धनवे यांना राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाकडून पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला.

Ambadwet Panchayat Samiti Election
PM RKVY Fund Maharashtra: महाराष्ट्राला 1,256 कोटींचे आरकेव्हीवाय अनुदान; कृषी क्षेत्राला केंद्राकडून मोठा दिलासा

यानंतर प्रचारतही धनवे आणि पेरणेकर या जोडगोळीने मोठी आघाडी घेत घरोघरी भेटी दिल्या, तसेच आमदार शंकर मांडेकर, राष्ट्रवादी युवक काँग््रेासचे अध्यक्ष सुखदेव मांडेकर यांचीही प्रचारात धनवे यांना मोठी मदत मिळाली. धनवे यांनी 8 हजार 547 एवढी मते घेत तब्बल 1 हजार 776 मतांनी विजयी मिळविला. यामुळे माघार घेत धनवे यांना दिलेल्या पाठिंब्याने संतोष पेरणेकर धनवेंच्या विजयात किंगमेकर ठरले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news