Amar Awale Pune Municipal Election: महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा मुलगा थेट नगरसेवक; अमर आवळेंची प्रेरणादायी झेप

नवी पेठ–पर्वती प्रभागातून भाजपच्या अमर आवळेंचा विजय, झोपडपट्टीतून सभागृहापर्यंतचा प्रवास
Amar Awale
Amar AwalePudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गज आणि विविध क्षेत्रातील नगरसेवक विजयी झाले आहेत. यामध्ये महापालिकेच्या सफाई कर्मचारी असलेल्या दाम्पत्यांचा मुलगा नगरसेवकही बनून महापालिका सभागृहात पोहचला आहे. भाजपचे प्रभाग क्र. 27 नवी पेठ- पर्वतीचे नवनिर्वाचित नगरसेवक अमर आवळे असे या नगरसेवकाचे नाव आहे.

Amar Awale
Pune Municipal Election Family Candidates: महापालिका निवडणुकीत कौटुंबिक लढती रंगात; कुणाला विजय, कुणाला पराभव

आवळे यांचे वडील महापालिकेच्या ड्रेनेज विभागात बिगारी म्हणून तर आई सफाई कामगार म्हणून काम करतात. सद्यःस्थितीला ते आंबिल ओढा कोठीला आहेत. आवळे हे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. महापालिका निवडणुकीत घाटे यांनी आवळेंच्या उमेदवारीसाठी जोरदार ताकद लावली होती. त्यावरून त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, घाटेंनी कार्यकर्त्याला संधी दिली आणि आवळे यांनी संधीचे सोने करीत विजय मिळविला.

Amar Awale
Congress Pune Municipal Election: भाजप लाटेतही काँग्रेसची मुसंडी; पुण्यात १५ जागांवर विजय, पुनरुज्जीवनाची चाहूल

आंबिल ओढा झोपडपट्टीत लहाणपण गेलेले आवळे आता महापालिकेच्या साने गुरुजी वसाहतीमधील क्वार्टरमध्ये राहतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत घडलेला हा कार्यकर्ता आता थेट महापालिकेच्या सभागृहात पोहचला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news