पुणे : रहिवाशांचे पाणी व्यावसायिकांच्या घशात!

पुणे : रहिवाशांचे पाणी व्यावसायिकांच्या घशात!

मांजरी : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेकडून मांजरी बुद्रुक गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. हे काम एक ठेकेदारास देण्यात आले असून, तो पाणी पुरवठ्यात मनमानी करत आहे. यामुळे माळवाडी, मांजराईनगर, गावठाण, सटवाईनगर, कुंजीर वस्ती या भागातील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. यामुळे नागरिकांनी शुक्रवारी (दि. 16) नागरिकांनी पाण्याचा टँकर अडवून संताप व्यक्त केला. टँकरचालक, ठेकेदार व मुकादम संगमताने व्यवसायिकांना पाणी विकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. टँकरचालक महिलांना एका बॅलर भरून देण्यासाठी वीस रुपये आकारत आहेत.

हॉटेल, भाडेतत्त्वावरील इमारतीच्या ठिकाणी संपूर्ण टँकर खाली करण्यासाठी तीनशे ते पाचशे रुपये घेतले जात आहे. संबंंधित ठेकेदार आणि लष्कर पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता निखिल रंधवे यांच्याकडे तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही. रहिवाशांच्या हक्काचे पाणी व्यावसायिकांच्या घशात घातले जात असल्यामुळे संतप्त नागरिकांनी पाण्याचा टँकर अडवून निषेध व्यक्त केला. मनमानी करणार्‍या ठेकेदारावर कारवाई व्हावी, या भागातील पाणी पुरवठ्यासाठी नवीन ठेकेदार नेमावा, अशी मागाणी या वेळी नागरिकांनी केली.

मांजरी बुद्रुक परिसरात पाणीपुरवठा करणार्‍या ठेकेदाराची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. महापालिका प्रशासनाने
या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे.
                                                    -बाळासाहेब घुले, रहिवासी, मांजरी बुद्रुक

या गावात टँकर अडवील्याची मला कल्पना नाही. मी नियमानुसार मांजरीत पाणीपुरवठा करत आहे. मात्र, चालकांकडून व्यावसायिकांना पाणी विकले जात असेल, तर त्याची माहिती घेऊन संबंधितावर कारवाई केली जाईल.
                                                 -रोहन शिवरकर, पाणीपुरवठा ठेकेदार

मांजरी बुद्रुक परिसरातील नागरिकांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात असून, त्यासाठी कोणतेही शुल्क आकराले जात नाही. खासगी टँकर व महापालिकेचा काही संबंध नाही. पाण्यासाठी पैसे घेतले जात असतील, याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.

                -एन. आर. रंधवे, उपअंभियंता, लष्कर पाणी पुरवठा विभाग, महापालिका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news