अलेक्सेंडर पोपटाची तस्करी करणारे वन अधिकार्‍यांच्या सापळ्यात..

अलेक्सेंडर पोपटाची तस्करी करणारे वन अधिकार्‍यांच्या सापळ्यात..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : औंध येथे अलेक्सेंडर (पहाडी) पोपटाची तस्करी करणार्‍या तीन आरोपींना वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून अटक केली आहे. वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार कोथरुड, चांदणी चौक येथील लोहिया आय. टी.पार्क आणि वारजे येथील आरएमडी चौक जवळ तीन आरोपीस वनविभाग पुणे यांनी बनावट ग्राहक बनून, सापळा लावून तीन आरोपींना दोन पहाडी पोपट बेकायदेशीरीत्या विकताना अटक करण्यात आले आहे.

यामध्ये पीयुष दत्तात्रेय पासलकर (वय 21 रा. कर्वे नगर), यश रमेश कानगुडे (वय 21 रा. वारजे , कर्वे नगर), सौरव कोंडिबा झोरे (वय 19 रा.वारजे, कर्वे नगर) अशा तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे. उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक दीपक पवार, वनक्षेत्रपाल भांबुर्डा प्रदीप सपकाळ, वनरक्षक के. ए. हाक्के आणि सहकार्‍यांनी कार्यवाही केली. या कारवाईसाठी सातार्‍यातील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सहकार्य केले.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news