Akhad Party: आखाड पार्टीचे बेत आखताय? पुण्यातील गावरान कोंबड्याचे दर वाचा, गगनाला भिडले भाव

Akhad Party In Pune: आता शेवटचे दोन दिवस
Chicken Price
गावरान कोंबड्याला मागणी वाढली; ग्रामीण भागात आखाड पार्टी जोमातPudhari
Published on
Updated on

Akhad Party in Pune Gavran Chicken Rate

वाल्हे: आषाढी एकादशीनंतर श्रावण मासारंभापर्यंत खेडोपाड्यांत घरोघरी आखाड पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. आषाढाच्या उत्तरार्धातील मंगळवार आणि शुक्रवार हा देवाला कोंबडी, बकरे कापून नवस फेडण्याची परंपरा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत आहे. त्यामुळे गावरान कोंबड्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. आषाढात खवय्ये चमचमीत मांसाहारी भोजन मित्रमंडळींसोबत खाण्याची मजा लुटत आहेत.

पावसाळा सुरू असल्याने माशांचा विणीचा हंगाम असतो. या दिवसात मासे कमी प्रमाणात मिळतात. आखाड पार्टीचा बेत काहीसा खास असावा अन् त्यासोबतीला रसरशीत गावरान कोंबड्यांचा ताव असावा, असे नियोजन असणार्‍यांनी बाजारात तसेच आजूबाजूच्या खेडेगावांत फेरफटका मारायला सुरुवात केली असून, ‘गावरान कोंबडा’ सगळ्यांच्या पसंतीला उतरत आहे.(Latest Pune News)

Chicken Price
Pune News: पालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांवर हल्ला; पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ

आषाढ पार्टीसाठी खवय्यांची पहिली पसंती गावरान कोंबडाच असतो. तोदेखील लाल तुरा, बांग देणाराच असावा. त्यामुळे या दिवसांत गावरान कोंबड्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. एरवी 500 ते 550 रुपयांत मिळणारा कोंबडा श्रावण सुरू होण्यापूर्वीच्या आठवड्यात कोंबडी बाजारात 650 ते 700 रुपयांच्या पुढेच मिळत आहे. या दिवसांत गावरान कोंबडीसोबतच वनराज कोंबडादेखील चांगलाच भाव खाऊन जात आहे.

आखाड साजरा करण्यासाठी पुढील दोन दिवस राहत असल्याने मंगळवारी (दि. 22) सर्वच मांसाहार दुकानात गर्दी दिसून येत होती. बुधवार (दि. 23) तसेच गुरुवार (दि. 24) असल्याने या दिवशी अनेक जण मांसाहार करीत नाहीत. यामुळे पुढील एकच दिवस म्हणजे बुधवार याच दिवशी मांसाहार जास्त होण्याची शक्यता आहे.

Chicken Price
Delhi Zoo Wildlife Deaths: दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात सर्वाधिक वन्यजीव मृत; आकडे चिंता वाढवणारे

पूर्वी ग्रामीण भागात या काळात बोकड किंवा बकरे वाट्यावर लावले जायचे. सध्या बकर्‍यांच्या मटणाचे दरदेखील वाढले आहेत. गावरान कोंबड्याची तुपातील बिर्याणी, सूप, गावरान मसाला, झणझणीत रस्सा आणि स्पेशल कोंबडीवडे, चुलीवरची भाकरी या घरगुती पदार्थांच्या मेजवानीचे बेत आखले जाऊ लागले आहेत.

कितीही महागाई होऊ द्या; गटारी होणारच

दारूवरील करांमध्ये प्रचंड वाढ केल्याने दारूच्या किंमतीत वाढ झाली. मटण, चिकनचे दरही वाढले, तरीही तळीरामांची गटारी साजरी करण्याची जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागच्या वर्षापेक्षा यंदा जास्त दारूविक्री होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्रापुरातील दारूविक्रेत्यांनी दिली. पोलिसांची मात्र यावर करडी नजर असणार आहे.

श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येणारी गटारी अमावास्या साजरी करण्याचा जोश तळीरामांमध्ये शिगेला पोहचला आहे. अनेक कुटुंबांत श्रावण प्रतिपदेपासून गणेश चतुर्थीपर्यंत मांस-मटणाला बंदी असते. त्यामुळे गटारीच्या दिवशी मच्छी, मटण व चिकनवर ताव मारला जातो. येत्या गुरुवारपासून श्रावण महिना सुरू होत असला, तरी सोमवार व मंगळवार मांसाहार केला जात नसल्याने बुधवारी गटारी साजरी होण्याचा रंग चढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील हॉटेल व धाब्यांवर गटारीची जोरदार पूर्वतयारी करण्यात आली आहे.

गटारी नक्की साजरी करा; पण अनुचित प्रकार घडेल असे कुठलेही कृत्य करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठी पूर्वतयारी सुरू केली आहे. गटारीच्या रात्री सगळीकडे गस्त करण्यात येऊन नियमित आढावा घेण्यात येणार आहे. त्यावर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news