

Malegao Sugar Factory Election Result
बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) ब वर्ग गटातून विजयी झाले आहेत. अजित पवार यांना ब वर्ग गटात ९१ मते तर भालचंद्र देवकते यांना १० मते मिळाली आहेत.
दरम्यान, अजित पवार गटाचे रतनकुमार भोसले आघाडीवर आहेत. तर तावरे गटाचे बाबुराव गायकवाड पिछाडीवर गेले आहेत. अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग गटामधून रतनकुमार भोसले आघाडीवर आहेत.
माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये एकूण चार पॅनेल तसेच अपक्ष उमेदवारांसह एकूण ९० उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री निळकंठेश्वर पॅनेल, चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बळीराजा सहकार बचाव पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समितीचे पॅनेल आणि इतर अपक्ष अशी लढत आहे.
‘माळेगाव’ हा उच्चांकी ऊसदर देणारा कारखाना आहे. त्यामुळे माळेगावचं भलं करण्याची धमक केवळ माझ्यात आहे,’ असा दावा अजित पवार यांनी प्रचारसभेदरम्यान केला होता.