कात्रज दूध संघाकडून अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत

कात्रज दूध संघाकडून अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे दौर्‍यात कात्रज डेअरीसमोरील राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोर ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. पवार हे पुण्याहून कोल्हापूरला नियोजित सभेसाठी जात असताना कात्रज दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी अजित पवार यांचा पुष्पहार घालून सत्कार केला आणि विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा भेट दिली.

यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक दिलीप थोपटे, अरुण चांभारे, कालिदास गोपालघरे, स्वप्निल ढमढेरे, निखिल तांबे, चंद्रकांत भिंगारे यांच्यासह संघाचे सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news