Daund Politics: दौंड तालुक्यात मोठा राजकीय भूकंप; प्रमुख नेत्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

या प्रवेशामुळे दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली
Daund Politics
दौंड तालुक्यात मोठा राजकीय भूकंप; प्रमुख नेत्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशPudhari
Published on
Updated on

leaders join Ajit Pawar's NCP

खोर: दौंड तालुक्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दौंड शहर व ग्रामीण भागातील अनेक प्रभावी नेत्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या सोहळ्यात माजी उपनगराध्यक्ष विलास शितोळे, वसीम शेख, दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर, प्रकाश नवले, ज्येष्ठ नेते पोपटराव ताकवणे, नानासाहेब जेधे, सयाजी ताकवणे, विशाल बारवकर, सागर जाधव, माजी नगरसेवक जीवराज पवार, राजेश गायकवाड, अफजल पानसरे आणि प्रशांत धनवे यांनी पक्षात प्रवेश केला. (Latest Pune News)

Daund Politics
Pune News: मृत्यूची तारीख लिहून भीती दाखवत भक्तांसोबत अश्लील चाळे; भोंदूबाबाचे कारनामे उघड

या प्रवेशामुळे दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली असून आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश "गेम चेंजर" ठरेल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. हा प्रवेश सोहळा दौंड तालुक्याच्या राजकारणाला नवे वळण देणारा ठरेल असे राजकीय वर्तुळांमध्ये सध्या चर्चिले जात आहे. नितीन दोरगे यांनी तालुकाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्या नंतर सर्वात मोठा व पहिला पक्ष प्रवेश झाला आहे.

या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे , पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष नितीन दोरगे, युवक तालुका अध्यक्ष सागर फडके, शहर युवक अध्यक्ष निखिल स्वामी तसेच अनिल नागवडे, गुरुमुख नारंग, महेश भागवत उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news