मुंबई : पुढारी वृत्तसेवा
ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला सोडून भाजपसोबत सत्तेत गेलेल्या अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाऐवजी आता आमदारकीचेच स्वप्न पाहावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लगावला आहे.
या पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला करून आपल्याला मुख्यमंत्री करतील, असेही स्वप्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिले होते. आता ते स्वप्न भंगले एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये आहे.
महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ७० ते ८० जागांपर्यंतच मजल मारता येणार आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे सोडून दिलेले बरे.