Ajit Pawar Tribute: पुणे जिल्हा परिषदेत 12 मार्चला अजित पवार यांना श्रद्धांजली सभा

सर्वपक्षीय आजी-माजी सदस्य व पदाधिकारी शरदचंद्र पवार सभागृहात एकत्र येणार
Pune Jilha Parishad
Pune Jilha ParishadPudhari
Published on
Updated on

पुणे: पुण्याच्या ग््राामीण विकासात मोठे योगदान देणाऱ्या दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे सर्वपक्षीय आजी-माजी सदस्य आणि पदाधिकारी एकत्र येणार आहेत. जि. प.त त्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Pune Jilha Parishad
Indapur Market Committee Petrol Pump: निमगाव केतकी उपबाजारात पेट्रोल पंप उभारणार

ही श्रद्धांजली सभा पंचायतराजचे जनक स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजता जि. प.च्या शरदचंद्र पवार सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Jilha Parishad
Bhor Panchayat Samiti Chairman Election: भोर पंचायत समिती सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुणे जिल्हा परिषदेसोबत सुमारे अडीच दशकांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले होते. ग््राामीण विकासाशी निगडित असलेल्या या पंचायतराज संस्थेच्या कामकाजावर त्यांचे नेहमीच विशेष लक्ष असायचे. जिल्हा परिषद मुख्यालयासह ग््राामीण भागातील अनेक सरकारी कार्यालयांच्या सुसज्ज व भव्य इमारती उभारण्यात पवार यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच दशकांत जि. प., तसेच सर्व पंचायत समित्यांमध्ये अनेकांना पदाधिकारी व सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आज या पदांवर काम केलेल्या अनेक व्यक्ती विविध राजकीय पक्षांत कार्यरत आहेत.

Pune Jilha Parishad
Transgender Students Fee Waiver Maharashtra: तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे 100% शुल्क माफ; महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जि. प.त आठ अध्यक्ष आणि आठ उपाध्यक्षांनी काम केले. तसेच विविध विषय समित्यांचे 32 सभापती, राष्ट्रवादी काँग््रेासचे चार गटनेते, जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांमधील 104 सभापती व 104 उपसभापती, जि. प.चे 300 सदस्य आणि पंचायत समित्यांचे जवळपास 600 सदस्य यांनी विविध पदांवर काम केले आहे.

Pune Jilha Parishad
Khed Panchayat Samiti Chairman Election: खेड पंचायत समिती सभापतीपदी विद्या मोहिते

अजितदादांच्या नेतृत्वाखालील जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षांमध्ये देवराम लांडे (जुन्नर), सतीश खोमणे (बारामती), वैशाली आबणे (दौंड), प्रा. सविता दगडे (मुळशी), दत्तात्रय भरणे (इंदापूर), प्रदीप कंद (हवेली), विश्वास देवकाते (बारामती) आणि निर्मला पानसरे (खेड) यांचा समावेश आहे. तर, उपाध्यक्षांमध्ये सतीश खोमणे, स्व. सुरेश गोरे, शरद लेंडे, अरुण गिरे, प्रदीप कंद, शुक्राचार्य वांजळे, विवेक वळसे पाटील आणि रणजित शिवतरे यांनी काम पाहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news