Baramati Traffic Signals| बारामतीत मुख्य ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवा: अजित पवार

गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पास गती मिळणार
Baramati News
बारामतीत मुख्य ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवा: अजित पवारPudhari
Published on
Updated on

बारामती: सार्वजनिक वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी शहरातील मुख्य 10 ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवा, चौकाला नावे देण्याची कार्यवाही करण्यासह रस्त्यावरील अतिक्रमणे काढावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. दरम्यान, सिग्नल यंत्रणा बसणार असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पास गती मिळणार आहे.

अजित पवार हे रविवारी (दि. 10) बारामती दौर्‍यावर होते. त्यांनी शहरातील तीन हत्ती चौक परिसर व ध्वजस्तंभ, गुणवडी चौक येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स, जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाच्या सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करून अधिकार्‍यांकडून माहिती घेतली. (Latest Pune News)

Baramati News
Shri Siddheshwar Mahadev temple: सुप्यातील हेमाडपंती धाटणीचे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर

पवार म्हणाले, नटराज नाट्यकला मंडळाच्या प्रांगणात 30 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात येत असून, त्याचे गतीने काम पूर्ण करा, नगरपरिषद कार्यालयाच्या शेजारील जागेवर हुतात्मा स्तंभ उभारण्याच्या दृष्टीने कामे करताना स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या ठळक घटनांचा समावेश करावा, परिसरात विद्युत रोषणाई करावी, याबाबत पवार यांनी सूचना केल्या.

जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी सर्व सुविधांनीयुक्त निवासस्थानाचे बांधकाम करावे, तसेच नागरिकांची वर्दळ विचारात घेता गुणवडी चौक येथील व्यापारी संकुलातील फरश्या, रंगरंगोटी, रस्ते आदी कामे गतीने पूर्ण करण्याच्याही सूचना पवार यांनी अधिकार्‍यांना दिल्या. शहरात उभारण्यात येणार्‍या सेंट्रल पार्कच्या समोरील जागेवर महापुरुषांचे पुतळे बसविण्याचे काम करण्यात येणार आहे.

Baramati News
Junnar Theft: जुन्नर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ

यासाठी आराखड्याचे सुधारित सादरीकरण तसेच बारामती बसस्थानक परिसर स्वच्छ करून अधिक सावली देणारी वृक्षांची लागवड करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या. तालुक्यात विविध विकासकामे सुरू असून, ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि गतीने पूर्ण करून वाहतूक सुरळीत ठेवण्याच्यादृष्टीने प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांनीही वाहतूक सुरक्षाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पवार यांनी केले.

या वेळी अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी पंकज भुसे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news