पुणे शहरातील हवेची गुणवत्ता घसरली! शिवाजीनगर, स्वारगेट, कात्रज सर्वाधिक प्रदूषित

पुणे शहरातील हवेची गुणवत्ता घसरली! शिवाजीनगर, स्वारगेट, कात्रज सर्वाधिक प्रदूषित

पुणे : शहराच्या हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांपासून खराब प्रकारात गणली जात आहे. सोमवारी शिवाजीनगर भागाची हवा सर्वाधिक प्रदूषित होती. त्या पाठोपाठ स्वारगेट, कात्रज. पाषाण, भूमकर चौक, निगडी भागांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक शहरांची हवेची गुणवत्ता खराब झाली आहे.

यात प्रामख्याने दिल्ली, मुंबई, अहमदाबाद व पुणे शहराचा यात समावेश आहे. त्यामुळे ज्यांना श्वसनाचे आजार आहेत त्यांना या खराब हवेचा खूप त्रास होत आहे. तसेच शहरात सर्दी, खोकला या आजारांंचेही प्रमाण वाढत आहे. सोमवारी शहरातील बहुतांश भागातील हवेची गुणवत्ता खराब व आरोग्य संवेदनशील गटांसाठी अनारोग्यकारक ठरली.

शिवाजीनगरचा घुसमटतोय श्वास
सोमवारी (दि. 12 डिसेंबर ) शिवाजीनगरच्या हवेची
गुणवत्ता 232 इतकी गणली केली. याचा अर्थ असा आहे की, या भागात वाहनांच्या इंधन ज्वलनातून निघालेले अतिसूक्ष्म हवेचे धुलीकण (पीएम 2.5) 232 मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर इतकी होती, तर सूक्ष्म धुलिकण (पीएम 10) चे प्रमाण1ा38 इतके होते.

पाषाणची हवा तुलनेने बरी…
शिवाजीनगरपाठोपाठ शहरातील स्वारगेट, कात्रज, कोथरुड या भागातील हवेची गुणवत्ता आरोग्याच्या बाबतीत संवेदनलशील असणार्‍या नागरिकांसाठी खराब असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले. स्वारगेटचा हवा गुणवत्ता निर्देशांक 188, भूमकर चौक 135, कोथरुड 153 तर कात्रजचा 102 इतका होता, तर पाषाण 92 (येथील हवा मध्य प्रकारात गणली गेली.)

वाहनांच्या धुरांतून सर्वाधिक प्रदूषण..
शहरातील इंडिन इंंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी यांच्या संस्थेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार शहरात वाहनांच्या धुरांतून सर्वाधिक हवा खराब होत आहे. त्यात अतिसूक्ष्म धुलिकण (पी.एम.2.5) चे प्रदूषण सर्वाधिक आहे. त्या पाठोपाठ धुलिकण (पी.एम .10) आहे. त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण आहे.

अतिसूक्ष्म धुलिकणातून होणारे प्रदूषण.. (पीएम 2.5)
वाहने : 46.5
उद्योग 24.4
घरांंतून ः 12.9
वार्याने उडूण येणारी धूळ ः 5.2

सूक्ष्म धुलिकणांतून होणारे प्रदूषण (पीएम 10)
उडून येणारी धूळ : 31.4
वाहने ः 25.2
उद्योग ः 23.8
घरांतून 12.4

अशी मोजतात हवेची गुणवत्ता
0 ते 50 (चांगली )
51 ते 100 (मध्यम)
101 ते 200 (अनारोग्यकारक)
201 ते 300 (घातक)
301 ते 400 (अतिघातक)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news