वातावरणातील बदलांबरोबर हवाही प्रदूषित!

वातावरणातील बदलांबरोबर हवाही प्रदूषित!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील वातावरणात बदल होताच हवेच्या गुणवत्तेतही बदल झाला आहे. शहराच्या हवेची सरासरी गुणवत्ता 105 ते 161 वर गेली आहे. यात स्वारगेट, शिवाजीनगर, पाषाण, कोथरूड, भुमकर चौक येथील गुणवत्ता खराब गटांत गेली आहे. दिवाळीत शहराच्या हवेची गुणवत्ता खराब गटांत होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना खूप त्रास झाला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांसह मेट्रोच्या कामांना नोटिसा बजाविल्या.

साइटवर काम करताना पत्र्याची उंची वीस फुटांपेक्षा जास्त करा, सिमेंट किंवा मातीची वाहतूक करताना साइटवर आणि रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारा, अशा सूचना केल्याने शहरातील हवाप्रदूषण आटोक्यात आले. मात्र, मार्च महिना सुरू होताच हवेतील आर्द्रता कमी होऊन शुष्क वातावरण तयार झाल्याने वाहनातून निघणार्‍या सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. त्यात स्वारगेट भागात हे 180 ते 200 मायक्रो ग्रॅम प्रतिक्युबिक मीटर इतके आहे. कारण, या भागात सायंकाळी वाहनांची प्रचंड कोंडी रोजच होते. त्यामुळे स्वारगेट परिसर सर्वाधिक प्रदूषित ठरला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news