AI jobs demand Pune: ज्याची एआयवर कमांड त्यालाच आयटीत डिमांड

हिंजवडी-खराडी आयटी पार्कमध्ये कॉस्ट कटिंगचे सावट; एआय, क्लाउड, डेटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटीतील तज्ञांना सुवर्णसंधी
AI jobs demand Pune
AI jobs demand PunePudhari
Published on
Updated on

आशिष देशमुख

पुणे : पुणे हे महाराष्ट्राचे प्रमुख माहिती तंत्रज्ञान केंद्र म्हणून ओळखले जाते. हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा येथील विशाल माहिती तंत्रज्ञान उद्यान अर्थात आयटी पार्कला जगाच्या नकाशावर स्थान मिळाले आहे. मात्र, सध्या या ठिकाणी कर्मचारीवर्गात कॉस्ट कटिंगच्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला एआयवर ज्याची कमांड आहे, त्यांची डिमांड वाढली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड आर्किटेक्चर, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा शिकलेल्यांना संधीची कवाडे खुली झाली आहेत.

AI jobs demand Pune
Kasba Ganpati Election Story: आळंदीच्या रेड्याला कसबा गणपतीच उलथवील: सूर्यकांत पाठकांची आठवण

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या ‌‘गैर-आवश्यक‌’ खर्चात कपात केली आहे. याचा थेट परिणाम माहिती तंत्रज्ञान सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांवर झाला आहे. नवीन प्रकल्प संथगतीने येत असल्याने किंवा मोठे करार पुढे ढकलले गेल्याने पारंपरिक माहिती तंत्रज्ञान सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र, ही कपात सर्वत्र एकसारखी नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड आर्किटेक्चर, डेटा सायन्स आणि सायबर सुरक्षा यांसारख्या अतिविशेष क्षेत्रांमध्ये आजही उच्च वेतन देऊन प्रतिभा मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. जागतिक खर्चकपात....

जागतिक मंदी आणि महागाईमुळे अमेरिकेसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आर्थिक आव्हाने आहेत. परिणामी, आंतरराष्ट्रीय ग््रााहक खर्च कमी करत आहेत. या ‌’खर्च कपात‌’ धोरणामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना राखीव कर्मचारी (बेंच) संख्या करत आहेत.

AI jobs demand Pune
Yerwada Election Politics: येरवडा-गांधीनगरात जागा वाटपावर महाविकास आघाडीचा पेच; भाजप-राष्ट्रवादीची कसरत

कुठे शोधाल नोकरी....

कर्मचाऱ्यांनी केवळ मोठ्या पारंपरिक सेवा कंपन्यांना लक्ष्य न करता जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी): बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पुणे येथील शाखा. -उत्पादन-आधारित कंपन्या चांगल्या पगारासह उत्कृष्ट करिअर संधी देतात. यात नव उद्यमी संस्था (स्टार्टअप्स)विशेषतः वित्त तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान, शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या. यांनाही प्राधान्य द्यावे.

नोकरकपातीची प्रमुख कारणे...

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वचालन (ऑटोमेशन)

हे सध्याचे सर्वांत मोठे आव्हान आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वचालन तंत्रज्ञानामुळे पुनरावृत्तीचे स्वरूप असलेले आणि नियम-आधारित कामे जलद गतीने होत आहेत.

डेटा एंट्री, मूलभूत तपासणी (टेस्टिंग), बॅक-ऑफिसचे कामकाज आणि मध्य-स्तरीय व्यवस्थापनाचे काही

भाग आता सॉफ्टवेअर अल्गोरिदम्सद्वारे हाताळले जात आहेत. यामुळे अशा भूमिकांमधील हजारो कर्मचाऱ्यांची गरज कमी झाली आहे.

कंपन्यांना कार्यक्षमता वाढवायची असल्याने, ते आता ‌‘जास्त लोक आणि कमी उत्पादन‌’ या मॉडेलऐवजी ‌‘कमी लोक आणि अधिक उत्पादन‌’ या मॉडेलकडे वळत आहेत.

बाजारात जावा, डॉट नेट, टेस्टिंगसारख्या पारंपारिक मंचांवर वर्षांनुवर्षे काम करणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.

परंतु कंपन्यांना आता क्लाउड, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (जनरेटिव्ह एआय), आणि डेटा अभियांत्रिकीचे ज्ञान असलेले लोक हवे आहेत.

जुने कौशल्य आणि नवीन तंत्रज्ञान यांच्यातील हे कौशल्य कर्मचाऱ्यांच्या छटणीचे प्रमुख कारण बनले आहे.

AI jobs demand Pune
Yerwada Problems PMC Election: येरवडा-गांधीनगरात अतिक्रमण-कोंडीचे सावट; मैदान अन्‌‍ उद्यानाचा आजही अभाव

आयटीतज्ज्ञ डॉ. शिकारपूर यांनी सांगितले उपाय...

विशिष्ट तंत्रज्ञानात कौशल्य सुधारणा करण्याची

गरज आहे. यात क्लाउड तंत्रज्ञान : ॲमेझॉन

वेब सेवा (एडब्ल्यूएस), मायक्रोसॉफ्ट ॲझूर,

गुगल क्लाउड (जीसीपी)

कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र शिक्षण (मशिन लर्निंग) : पायथॉन, आर, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्स.

विकसन आणि कार्यान्वयन (डेव्ह ऑप्स) आणि साइट विश्वसनीयता अभियांत्रिकी (एसआरई) : सतत एकात्मीकरण, सतत वितरण प्रक्रिया (सीआय/सीडी पाइपलाइन), क्युबरनेटिस.

माहिती विश्लेषण (डेटा ॲनालिटिक्स) आणि माहिती सुरक्षा. ही कौशल्ये असणारे कर्मचारी आजही सर्वाधिक मागणीत आहेत.

कर्मचाऱ्यांनी केवळ कामावर अवलंबून न राहता पुणे शहरात आयोजित होणाऱ्या विविध तंत्रज्ञान मेळावे, तंत्रज्ञान स्पर्धा (हॅकाथॉन्स) आणि उद्योग परिषदेत सक्रिय सहभाग घ्यावा.

लिंक्डइनसारख्या व्यावसायिक मंचावर आपले काम (गिटहब योगदान, प्रमाणपत्रे) सातत्याने दर्शवणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे विशेष भरती करणाऱ्या कंपन्यांचे लक्ष वेधले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news