Tourist App: पर्यटनस्थळांच्या माहितीसाठी एआय आधारित अ‍ॅप; 140 पर्यटनस्थळांची माहिती एकाच ठिकाणी होणार उपलब्ध

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
Tourist App
पर्यटनस्थळांच्या माहितीसाठी एआय आधारित अ‍ॅप; 140 पर्यटनस्थळांची माहिती एकाच ठिकाणी होणार उपलब्धFile Photo
Published on
Updated on

पुणे: पुणे जिल्ह्यात असणार्‍या सर्व पर्यटनस्थळांची इत्थंभूत माहिती असणारे एक संकेतस्थळ आणि अ‍ॅप जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार केले जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय ) वापरून हे संकेतस्थळ आणि अ‍ॅप कार्य करेल. पुण्यासंबंधी गुगलवर जी काही माहिती उपलब्ध आहे, ती सर्व माहिती वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी दिसेल. त्यामुळे जे काही चांगले आहे, ते निवडण्याचा पर्याय पर्यटकांसमोर राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक ठिकाणे पुणे जिल्ह्यात आहेत. ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सुमारे 140 पर्यटनस्थळे आहेत. ही स्थळे जागतिक नकाशावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. (Latest Pune News)

Tourist App
Rahul Kool: राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करणारा नेता, फडणवीसांचा विश्वासू भाजपसाठी 'गेमचेंजर' ठरणार?

पर्यटन वाढवायचे असेल आणि त्याच वेळी पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा ठेवायची असेल, तर डिजिटल पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे, असे सांगताना डुडी म्हणाले, पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात; मात्र त्यांच्याकडे कोणतेही नियोजन नसते. पर्यटकांना कुठे जावे, काय पाहावे, तिथे कसे पोहोचावे याची माहिती नसते.

म्हणूनच पर्यटकांना मार्गदर्शन करणारे, सर्व माहिती असलेले संकेतस्थळ व अ‍ॅप तयार करण्यात येत आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे एकाच वेळी पर्यटनस्थळी गर्दी होणार नाही याची दक्षता या अ‍ॅप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.

Tourist App
Leopard Attack: शेतात गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला; खडकीत भीतीचं वातावरण

गर्दीच्या वेळी किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा, याचे व्यवस्थापन या प्लॅटफॉर्मवरूनच होणार आहे. ग्रामसमिती आणि वनविभागाच्या मदतीने प्रत्येक स्थळासाठी पर्यटकांची मर्यादा ठरवली जाईल. त्यानुसारच बुकिंग घेतले जाईल. सर्व पर्यटनस्थळी मुख्यतः स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याचेही डुडी यांनी स्पष्ट केले.

तीन महिन्यांत अ‍ॅप आणि संकेतस्थळ तयार

पुढील तीन महिन्यांत हे संकेतस्थळ आणि अ‍ॅप तयार होणार असून, जगभरातील पर्यटकांना याचा लाभ घेता येणार आहे. वाहतूक व्यवस्था, राहण्याची सोय, उपलब्ध अ‍ॅक्टिव्हिटी, एक ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी कसे जायचे, पार्किंग सुविधा यासारखी माहिती इथे मिळेल.

जिल्हा निसर्गसंपन्न असून, गड-किल्ले, धरणे, टेकड्या, गवताळ प्रदेश, लेणी, ऐतिहासिक वारसास्थळे अशी अनेक पर्यटनस्थळे येथे आहेत. ही सर्व ठिकाणे एकमेकांशी जोडणारी चांगली कनेक्टिव्हिटीही आहे. त्यामुळे राज्यातीलच नव्हे, तर परराज्य व परदेशातून देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक पुणे जिल्ह्यात येतात. मात्र, ही स्थळे कुठे आहेत, तेथे कसे जायचे, ट्रान्सपोर्टची काय व कुठून सुविधा आहे, निवास व खानपान यासाठी काय सुविधा आहेत, याची एकत्रित माहिती पर्यटकांना या प्लॅटफॉर्मवरून मिळणार आहे.

जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news