Pune Accident: अहिल्यानगर–कल्याण महामार्गावर गुळाचा ट्रक खोल खड्ड्यात कोसळला; मोठी दुर्घटना टळली

“गुंजाळवाडीतील चारंबा बा मंदिराजवळ चालकाचा ताबा सुटल्याने अपघात; संरक्षण कठडे तोडून ट्रक पलटी”
Pune Accident
Pune AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

बेल्हे: अहिल्यानगर–कल्याण महामार्गावर गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथील चारंबा बा मंदिराजवळ गुळाची वाहतूक करणारा मालवाहतूक ट्रक पलटी होऊन खोल खड्ड्यात कोसळल्याची घटना शुक्रवारी (दि. २) घडली.

या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने मंदिराला कोणतीही मोठी हानी झाली नाही. ट्रक मंदिरापासून अगदी काही अंतरावर कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ट्रक हा चौफुला येथून गुळ भरून गुजरातच्या दिशेने जात होता. गुंजाळवाडी येथील चारंबा बा मंदिराजवळ आल्यानंतर ट्रकमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला असलेले संरक्षण कठडे तोडून खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाला.

Pune Accident
Shirur ACB Trap: शिरूर पोलिस ठाण्यात एसीबीची मोठी कारवाई! एकाच दिवशी दोन हवालदार लाचप्रकरणी जाळ्यात

ट्रक मंदिराच्या अगदी जवळ जाऊन कोसळल्याने मंदिराचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. मात्र, ट्रक मंदिरापासून काही अंतरावर थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातानंतर ट्रकमधील गुळाचा माल तसेच ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काही काळ महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्येही या अपघातामुळे कुतूहल निर्माण झाले होते. ट्रक खोल खड्ड्यात कोसळल्याने तो बाहेर काढण्यासाठी यंत्रसामग्रीची आवश्यकता भासणार आहे.

Pune Accident
Chlorine Gas Leak Pune| येरवड्यात स्वीमिंग पूलमध्ये अचानक क्लोरिन गॅसची गळती! १३ जणांची प्रकृती बिघडली; पोलिसांकडून चौकशी

दरम्यान, या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण कठड्यांची स्थिती, तसेच अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news