

इंदापूर: राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आदेश काढल्यानंतर ओबीसी समाजाकडून आंदोलन केले जात आहे. बारामतीत ओबीसींचा एल्गार मोर्चा पार पडला.
राज्य सरकारने ओबीसींवर अन्याय केलाय, असा आरोप लक्ष्मण हाकेंकडून केला जातोय. यावर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना प्रतिक्रिया विचारली असता लक्ष्मण हाके यांना लय महत्त्व देऊ नका, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. (Latest Pune News)
रविवारी (दि. 7) इंदापूर शहरात कृषिमंत्री भरणे आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांवर अन्याय होणार नाही, याबाबतीत राज्य सरकार काळजी घेईल.
सर्वांचे रक्त लाल आहे. काही लोक समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासन दोन्ही समाजांना सारखाच न्याय देईल, असेही भरणे यांनी म्हटले आहे.