इंदापूर: इंदापूर तालुक्यातील गणेश मंडळांना विसर्जनादिवशी शनिवारी (दि. 6) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सदिच्छा भेटी दिल्या. त्या वेळी आरती करत त्यांनी विसर्जन मिरवणुकीतही सहभाग घेतला. काही ठिकाणी मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कृषिमंत्री भरणे यांनी भन्नाट डान्स करीत जल्लोष केला. कृषिमंत्री भरणे मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेऊन नाचण्याचा आनंद लुटला.
गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नसून तो समाजाला एकत्र बांधणारा, संस्कृती जपणारा आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उत्सव आहे. राज्याची परंपरा व संस्कृती जपली जाते. (Latest Pune News)
ही परंपरा आणि संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी, यासाठी गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून शासनाने 14 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर केले आहे. आपली गणरायाच्या मिरवणुकीची परंपरा पुढे अशीच कायम राहणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.