Water Crisis: सांगवीतील शेती पाण्याअभावी धोक्यात; विहिरींच्या पाण्याने गाठला तळ

जलसंपदा व पाणी वापर संस्थांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका
Water Crisis
Water Crisis: सांगवीतील शेती पाण्याअभावी धोक्यात; विहिरींच्या पाण्याने गाठला तळPudhari
Published on
Updated on

सांगवी: बारामती तालुक्यातील सांगवी परिसरातील शेती निरा डावा कालव्याच्या वितरिका क्र. 18 वर अवलंबून आहे. या वितरिकेवरील सांगवी परिसरातील शेती पाण्याअभावी धोक्यात आली आहे. जलसंपदा विभाग व पाणी वापर संस्थांच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप लाभधारक शेतकर्‍यांमधून होत आहे. शेती पिके वाचविण्यासाठी तातडीने वितरिकेला आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

निरा डावा कालव्याच्या वितरिका क्र. 18 वर सांगवी, शिरवली, कांबळेश्वर, शिरष्णे, धुमाळवाडी, मानाजीनगर, भिकोबानगर व पवईमाळ या गावांतील शेती अवलंबून आहे. या वितरिकेला मागील आवर्तन 9 मार्च रोजी सोडण्यात आले होते. (Latest Pune News)

Water Crisis
श्री छत्रपतीच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची माघार

आवर्तन सुटून जवळपास 52 दिवस उलटले तरी उन्हाळ्याचे दुसरे आवर्तन सोडले जात नसल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सूर्य आग ओकत असून, या भागातील तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने शेतातील सर्वच पिके पाण्याअभावी सुकलेली दिसत आहेत. एकरी हजारो रुपये खर्च करून जगविण्यात आलेली पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत.

शेतीच्या आवर्तनाबाबत जलसंपदा खाते गांभीर्याने घेत नाही. पाणी वापर संस्थाही दखल घेत नसल्याचा आरोप लाभधारक शेतकर्‍यांनमधून होतो आहे. प्रचंड उन्हाळ्यामुळे विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या असून, विंधनविहिरीही बंद पडल्या आहेत. त्यामुळे शेतातील पिके नेमकी जगवायची कशी, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

Water Crisis
Crime News : कोपरगाव घड्याळ लुटीत बिहारी टोळीचा हात; आठ जणांच्या हातात बेड्या

वितरिका क्र.18 वरील एका पाणी वापर संस्थेशी संपर्क साधला असता संबंधित संस्थेच्या सचिवांनी सांगितले की, आम्हाला जलसंपदा विभाग आमच्या संस्थेला पाणी मागणीच्या पत्राची मागणी करत असते. परंतु, अद्याप आम्हाला तशा सूचना जलसंपदा विभागाने केल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच जलसंपदा विभाग व पाणी वापर संस्थांच्या या अजब कारभाराची चर्चा होऊ लागली आहे. पत्र मागणी आणि पत्र देणे या भानगडीत मात्र शेतकरी होरपळला जात आहे.

निरा डावा कालव्याच्या वितरिका क्र. 18 ला 10 तारखेच्या आसपास शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. तसेच, शेतीसाठी आवर्तन सोडण्याबाबत या वितरिकेवरील एकाही पाणी वापर संस्थेने लेखी पत्रव्यवहार केलेला नाही.

- संदेश भोसले, शाखा अभियंता, पणदरे जलसंपदा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news