New Lichen Species: पश्चिम घाटात बुरशीच्या पाच नवीन प्रजातींचा शोध

आघारकर संस्थेतील संशोधकांची कामगिरी; जेथे लायकेन प्रजातीची बुरशी, तेथे प्रदूषण नसते
New Lichen Species
New Lichen SpeciesPudhari
Published on
Updated on

पुणे: आघारकर संस्थेतील संशोधकांच्या चमूने ॲलोग्राफा प्रजातीतील लायकेन निर्माण करणाऱ्या बुरशीच्या पाच नवीन प्रजाती शोधल्या आहेत. जेथे लायकेन प्रजातीची बुरशी असते, तेथे प्रदूषण नसते. कारण, ही बुरशी प्रदूषित वातावरणात जगूच शकत नाही.

प्रदूषण आणि अधिवासातील बदलांप्रती असलेल्या संवेदनशीलतेमुळे या प्रजाती वनांचे आरोग्य आणि पर्यावरणाच्या गुणवत्तेचे एक महत्त्वाचे सूचक आहेत. ॲलोग्राफा ही ग्राफिडेसी प्रजातीमधील लायकेन निर्माण करणाऱ्या बुरशीची एक प्रजाती आहे. जिचे फळ देणारे भाग लांबट असतात. यामध्ये २०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत.

New Lichen Species
Pune Road Issue: शहरात किती किलोमीटरचे रस्ते? महापालिकेच्या दोन विभागांकडे भिन्न आकडेवारी

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या संशोधकांनी ग्राफिडेसी या लायकेन कुळातील सर्वांत वैविध्यपूर्ण वंशांपैकी एकातील प्रजातींमधील विविधता आणि उत्क्रांतीमधील संबंधांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी पारंपरिक वर्गीकरण पद्धतींना आधुनिक आण्विक वंशवृक्ष शास्त्रासोबत जोडले आहे.

असंख्य नमुने गोळा, काळजीपूर्वक तपासणी

राजेशकुमार के. सी. (मुख्य संशोधक), पीएचडी विद्यार्थी पी. ए. अंसिल, तांत्रिक अधिकारी डॉ. भारती शर्मा (सह मुख्य संशोधक) यांच्या नेतृत्वाखालील संघाने पश्चिम घाटात केलेल्या विस्तृत क्षेत्रीय सर्वेक्षणाद्वारे उष्णकटिबंधीय वन अधिवासांमधून असंख्य नमुने गोळा केले आणि त्यांची काळजीपूर्वक तपासणी केली.

New Lichen Species
Pawana Dam Water Storage: पवना धरण ९३ टक्के भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

डॉ. नायका यांच्या सन्मानार्थ ठेवले नाव

या अभ्यासातून पाच नवीन प्रजातींचा शोध लागला आणि त्यांचे वर्णन करण्यात आले. ॲलोग्राफा केरालेन्सिस ज्याचे नाव केरळ राज्याच्या नावावरून ठेवले आहे. ज्याचे नाव भारतीय शेवाळशास्त्रज्ञ डॉ. संजीव नायका यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news