

पुणे : पुढारी वृत्तसेवा
म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला बीड येथील धानोरा येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे म्हाडाप्रकरणी अटक झालेल्या आरोपींची संख्या आता अकरावर गेली आहे.
कांचन श्रीमंत साळवे (नागसेन नगर, धानोरा, बीड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी अटक केलेल्या सानप बंधूच्या संपर्कात कांचन साळवे हा एजंट होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
म्हाडा परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी सायबर पोलिसांनी अकरा जणांना अटक केली होती.