

पिंपरी(पुणे) : आपल्या मुलांला शिस्त लागावी, नवनवीन गोष्टी शिकून त्यांच्या ज्ञानात भर पडावी. तसेच सध्या बोलीभाषेबरोबरच इंग्रजी भाषेचेही आकलन त्यांना व्हावे, या उद्देशाने अनेक पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. अशाच एका लहान चिमुकल्याला पालकांनी खासगी शाळेत घातले होते. आयुष जाधव हा इतर मुलांपेक्षा चंचल आहे. त्यामुळे त्याला खासगी शाळेत अॅडमिशनसाठी नकार देण्यात आला होता. त्यानंतर पालकांनी मराठी माध्यामाच्या शाळेत घातले आणि चार वर्षाचा आयुष जाधव पाचवीच्या मुलांला देखील वाचला न येणारे इंग्रजी भाषेतील शब्द सहजरित्या वाचतो, हे सांगितले नंतर कोणालाही नवल वाटेल हे नक्कीच…
लहानांपासून मोठ्यापर्यंत इंग्रजी बोलण्याच्या वाचण्याच्या जण काय स्पर्धा सुरु आहेत. त्यामुळे पालकांकडून देखील मुलांमध्ये गुण यावे यासाठी नामांकित इंग्रजी शाळेत घातले जाते. मात्र आयुष जाधवला देखील इंग्रजी शाळेत घातले होते. त्यावेळी तीन दिवसातच त्याला खासगी शाळेतुन काढण्यात आले होते. तेव्हा त्याच्या पालकांना त्याच्या शिषणाविषयी चिंता वाटू लागली. त्यानंतर पालकांनी महापालिकेच्या नागु भाऊ बारणे मुले शाळा थेरगाव येथे बालवाडी छोटा गट या वर्गात घातले. मात्र या शाळेत आयुष जाधवला तीन महिने झाले असुन शिक्षकांच्या लक्षात आले आयुष जाधव हा अन्या मुलापेक्षा आतिहुशार आहे.
बालवाडी वर्गात शिकल असलेला आयुष हा चार वर्षाचा आहे. आणि तो इतके स्पष्ट वाचुन करतो. जसे पाचवी ते आठवीतील विद्यार्थार्या प्रमाणे वाचतो.आयुष हा इंग्रजी विषयातील विविध पुस्तके सहज वाचतो. दैनिक वृत्तपत्र, इंग्रजी वाचतो, कविता, कोणतेही पुस्तक आयुष वाचु शकतो. त्यामुळे आयुषचे कौतुक केले जात आहे. कारण चार वर्षाचा चिमुकला इतके स्पष्ट वाचु शकतो. हे नवलच आहे. एक चिमुकला अवघड शब्द न चुकता वाचतो हे आश्चर्याची बाब आहे.
इतर मुलांपेक्षा आयुष हा प्रत्येक शब्द लगेच लक्षात ठेवतो. त्याला कोणतीही कविता लगेच तोंडपाठ होते. कोणतेही पुस्तक तो न चुकता वाचतो. त्यामुळे शाळा सुटण्यापूर्वी मी त्याचे दहा मिनिटे वाचन घेते. सुरुवातीला आला तेव्हा तो गोंधळला होता. मात्र हळुहळु मुलांमध्ये रमू लागला. आता न घाबरता मोठयाने वाचतो करतो.
-रंजना साळवी, वर्गशिक्षिका.
हेही वाचा