पिंपरी : अखेर जुनी सांगवीची स्मशानभूमी चकाचक

पिंपरी : अखेर जुनी सांगवीची स्मशानभूमी चकाचक
Published on
Updated on

दापोडी : पुढारी वृत्तसेवा : जुनी सांगवीतील स्मशानभूमीच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अखेर जुनी सांगवीची स्मशानभूमी चकाचक झाली आहे. या दुरुस्तीमध्ये (मृतदेह) शवदहन करण्याचे तीनही लोखंडी बेड नवीन केले. काही ग्रेनाईट तुटलेले नवीन टाकले, बोरवेल दुरुस्ती व रबरी पाईप नवीन टाकला, लोंखडी शेडचे खराब झालेले पाइप नवीन टाकले. शेड पेंन्टीग करण्यात आले. स्माशभूमीची सीमाभिंत पेन्टिंग करण्यात आली. सीमाभिंतीवरील ग्रिल पेंन्टीग करण्यात आले. सिंमेट ब्लॅाकचा रस्ता खचलेला व काही भागात तुटलेला रस्ता दुरुस्त करण्यात आला.

तसेच मुख्य रस्त्यावरून येता-जाता शव जळताना दिसत असे, यासाठी हिरवी नेट लावण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील जुनी सांगवीतील स्मशानभूमीत अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. स्मशानभूमीच्या आतमध्ये येण्याच्या मार्गावर रस्ता काही भागात खचला होता. अंत्यविधी शव (मृतदेह) नेण्यासाठी अडथळा, दहन करण्याच्या बाजूचे शेडचे चौरस पाईप तुटले होते. काही सडले होते, साइडचे ग्रेनाईट लावलेले काही खाली निखळून पडले होते. दहन करण्याचे तीनही लोखंडी बेड तुटले होते. वाकलेत त्यामुळे लाकडे (सरन) रचता येत नव्हती, हे सर्वच बेड दुरुस्ती करणे आवश्यक होते.

बोरवेलच्या झाकणाच्या बिजागर्‍या तुटल्या होत्या. कोरोनाच्या काळात जास्त शव आल्यास आजूबाजूस जमिनीवर शव दहन केल्याने जमिनीवरील घडवलेले दगड फुटलेत व खड्डे पडलेत ते दुरुस्त करणे, अशा अनेक समस्यांचा जुनी व नवी सांगवीतील शवदहन करण्यास नागरिकांना त्रास व्हायचा. याबाबत मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांना स्थापत्यचे सहाय्यक अभियंता राजेंद्र हप्ते व कनिष्ठ अभियंता सचिन मगर यांनी सहकार्य केले.

जनसंवाद सभेमध्ये मनसेचे राजू सावळे यांनी तक्रार दिल्यानंतर त्या ठिकाणची पाहणी करून रहिवाशांच्या मागणीनुसार सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आज स्मशान भूमीमध्ये कोणत्याही प्रकारची गैरसोय नाही. ज्या गैरसोयी होत्या, त्या दूर करण्यात आल्या आहेत.
                                                   – जयकुमार गुजर, स्थापत्य उपअभियंता.

जनसंवाद सभेमध्ये जुनी सांगवी येथील रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर या स्मशानभूमीची पाहणी केली, यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ज्या गैरसोयी होत्या. त्या पूर्णपणे दुरुस्तीच्या रूपाने पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. सध्या कोणत्याही प्रकारची गैरसोय स्मशानभूमीमध्ये राहिलेली नाही.
                                                  – संतोष कांबळे, माजी नगरसेवक सांगवी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news