Afghan Apples Pune Market: सीमापार नव्हे, समुद्र ओलांडून अफगाणी सफरचंद पुण्यात

पहलगाम हल्ल्यानंतर वाघा बॉर्डर बंद झाल्याचा परिणाम मार्केट यार्डात दहा किलोला 900 ते 1100 रुपयांचा दर
सीमापार नव्हे, समुद्र ओलांडून अफगाणी सफरचंद पुण्यात
सीमापार नव्हे, समुद्र ओलांडून अफगाणी सफरचंद पुण्यातPudhari
Published on
Updated on

पुणे : पहलगाम हल्ल्यानंतर वाघा बॉर्डर बंद झाल्याने एरवी पाकिस्तानमार्गे दाखल होणारे अफगाणी सफरचंद आता इराणहून समुद्रमार्गे भारतात दाखल होऊ लागले आहे. नव्या मार्गामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली असली, तरी हाताळणी कमी झाल्याने दर्जेदार सफरचंद बाजारात उपलब्ध होत आहेत. घाऊक बाजारात त्याच्या दहा किलोला 900 ते 1100 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात सर्व सफरचंदांची 160 ते 320 रुपये किलो दराने विक्री होत आहे.(Latest Pune News)

सीमापार नव्हे, समुद्र ओलांडून अफगाणी सफरचंद पुण्यात
Kamla Nehru Hospital Doctors Attendance: वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मस्टरवर हजर, रुग्णालयात गैरहजर

गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात देशासह परदेशातून सफचंंद दाखल होत आहेत. यंदा हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये अतिवृष्टी झाली. त्याचा फटका येथील सफरचंदांच्या बागांना मोठ्या प्रमाणात बसला. परिणामी, देशी सफरचंदांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यात पोषक वातावरणामुळे अफगाणिस्तान येथील सफरचंदांचा हंगाम पंधरा दिवस अगोदर सुरू झाला आहे. सद्य:स्थितीत मार्केट यार्डात दर्जेदार अफगाणी सफरचंद मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत आहेत. वाहतूक खर्चात वाढ झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत दरात दहा किलोमागे शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. लाल जर्द आणि कोणतीही वॅक्सीन प्रक्रिया केलेली नसल्याने या सफरचंदांना पुणेकरांची पसंती मिळत असल्याची माहिती गुरुदत्त इम्पॅक्टचे संचालक व आयातदार शिवजित झेंडे यांनी दिली.

सीमापार नव्हे, समुद्र ओलांडून अफगाणी सफरचंद पुण्यात
Mula Mutha River Tree Cutting: नदीकाठावरील वृक्षतोडीवर आळा घाला; केंद्रीय समितीची राज्य सरकारकडे तक्रार

हाताळणी कमी; दरात वाढ

अफगाणिस्ताने येथून रस्त्याने सफरचंद इराणमध्ये दाखल होत आहेत. त्यानंतर इराण येथून समुद्रमार्गे ते मुंबई येथे व तेथून देशभरात जात आहेत. रस्तेमार्गाने होणारी फळांची हाताळणी कमी झाली आहे. त्यामुळे, सफरचंदांची गुणवत्ता टिकण्यास मदत झाली आहे. मात्र, समुद्रामार्गे वाहतूक होत असल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. परिणामी, गतवर्षी दहा किलोला 800 ते 900 रुपये मिळणारा दर यंदा 900 ते 1 हजार 100 रुपयांवर पोहचला असला आहे.

सीमापार नव्हे, समुद्र ओलांडून अफगाणी सफरचंद पुण्यात
Janata Vasahat TDR scam Pune: जनता वसाहत टीडीआर प्रकरणात बड्या नेत्याचा दबाव?

सफरचंद वजन घाऊक दर

काश्मीर 14 ते 16 किलो 1000 ते 1400

किन्नोर 10 किलो 1600 ते 1800

अफगाणी 10 किलो 900 ते 1100

गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात विक्रीसाठी दाखल झालेले सफरचंद.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news