लेण्याद्री :‘रेशनिंग धान्यावरील हक्क सक्षम नागरिकांनी सोडावा’

लेण्याद्री :‘रेशनिंग धान्यावरील हक्क सक्षम नागरिकांनी सोडावा’

लेण्याद्री, पुढारी वृत्तसेवा: 'आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांनी रेशन धान्यावरील हक्क स्वतःहून सोडावा,' असे आवाहन जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. सरकारी नोकरदार, बागायतदार, खासगी क्षेत्रातील मोठे पगारदार, आयकरदाते आदी आर्थिक सक्षम गटातील नागरिकांनी याबाबतचे विहित अर्ज रेशन दुकानदार, तलाठी किंवा तहसील कार्यालयात सप्टेंबरअखेर जमा करावयाचे आहेत. या अर्जात कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 44 हजारांपेक्षा जास्त असल्यामुळे आम्ही रेशनिंगचा लाभ नाकारत आहोत, असे नमूद करावयाचे आहे.

स्वेच्छेने बाहेर न पडलेले लाभार्थी तपासणीदरम्यान निकषांपेक्षा जास्त उत्पन्न गटातील आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंढे यांनी दिली. दरम्यान, जुन्नरमध्ये 163 रास्त दुकानांद्वारे अन्त्योदय योजनेंतर्गत (पिवळे कार्ड) लाभ घेत असलेल्या 6846 कुटुंबांना तसेच 58901 प्राधान्य गट कुटुंबांना (केसरी कार्ड) धान्याचे वाटप केले जाते. तालुक्यात या दोन्ही गटांतील 3 लाख 5 हजार 38 नागरिक या रास्त धान्य योजनेचे लाभार्थी असल्याची माहिती पुरवठा अधिकारी जी. बी. ठाकरे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news