पुणे महापालिकेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

पुणे महापालिकेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या वतीने 2022-23 या वर्षासाठी दिल्या जाणार्‍या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील 10, तर खासगी प्राथमिक शाळांमधील 4 शिक्षकांचा समावेश आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने महापालिका हद्दीतील प्राथमिक शिक्षकांना 2022-23 या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकूण 59 प्रस्ताव आले होते. या प्रस्तावांमधून आदर्श शिक्षक निवडण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती नेमण्यात आली होती. शासन निकषाप्रमाणे आलेल्या प्रस्तावामधून आदर्श शिक्षक यादी तयार करण्यात आली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी शिक्षकांना मानपत्र, सन्मानचिन्ह, तसेच टॅब देऊन गौरविण्यात येणार आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते
महापालिका शाळा : अंकुश शिवाजी माने, ज्ञानेश वसंतराव हंबीर, नवनाथ बाळासाहेब भोसले, रजनी गोविंद गोडसे, हेमलता भीमराव चव्हाण, विजय दिगंबर माने, राणी जयंत कुलकर्णी, चित्रा नितीन पेंढारकर, स्मिता अशोक धारूरकर, वर्षा अनंतकुमार पंचभाई.
खासगी प्राथमिक शाळा: पुष्पा महेंद्र देशमाने, रोहिणी गणेश हेमाडे, डॉ. प्रीती दिवाकर मानेकर, शुभदा दीपक शिरोडे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news