Executive Engineer action: अखेर खडकवासला पाटबंधारेच्या वादग्रस्त कार्यकारी महिला अभियंत्यावर कारवाई

सक्तीच्या रजेवर किंवा तातडीने बदली करण्याचे आदेश
Khadakwasla Irrigation
अखेर खडकवासला पाटबंधारेच्या वादग्रस्त कार्यकारी महिला अभियंत्यावर कारवाईPudhari
Published on
Updated on

पुणे: जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेल्या खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्यावर कृष्णा खोरे विकास महामंडळाने अखेर कारवाई केली आहे. कुऱ्हाडे यांची खडकवासला पाटबंधारे विभागातून तातडीने बदली करावी, बदली होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे अथवा पुणे पाटबंधारे मंडळ विभागाच्या तांत्रिक व प्रशासकीय नियंत्रण उपविभागात त्यांची नियुक्ती करावी, असे आदेश कृष्णा खोरे विकास महामंडळाचे विशेष अधीक्षक शाम हिंगे यांनी काढले आहेत.

याबाबत महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र दिले आहे. कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्या मनमानी आणि असंवेदनशील कामकाजाबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळ, तसेच जलसंपदा विभागाकडे कर्मचाऱ्यांनी अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. (Latest Pune News)

Khadakwasla Irrigation
Pune Grand Challenge: ‘पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर 2026‌’साठी 200 स्पीडबेकर काढणार! महापालिका करणार 145.75 कोटी रुपये खर्च

खडकवासला धरणसाखळीतील पानशेत, वरसगाव, खडकवासला धरणाच्या नियमित देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष, मनमानी, बेशिस्त कारभार आदी तक्रारी जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. त्यानुसार केलेल्या चौकशीत या तक्रारींमध्ये तथ्य आढळले आहे. त्यामुळे कुऱ्हाडे यांच्यावर उचित कारवाई करण्याबाबत शिफारस केल्याचे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे विशेष अधीक्षक शाम हिंगे यांनी पत्रात म्हटले आहे.

Khadakwasla Irrigation
Pune drunk driving Cases: शहरात 13 हजार 888 मद्यपींवर कारवाईचा बडगा

104 पानांचा अहवाल

कृष्णा खोरे महामंडळाने कुऱ्हाडे यांच्यावरील तक्रारींची छाननी केली. चौकशीत तक्रारींमध्ये तथ्य आढळले आहे. महामंडळाने याबाबत तब्बल 104 पानांचा अहवाल तयार केला आहे. वारंवार तक्रार करूनही अनेक महिन्यांपासून कुऱ्हाडे यांच्यावर कारवाई करण्यात प्रशासन टाळाटाळ करत होते. याच्या निषेधार्थ जलसंपदा विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले होते. अधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वरिष्ठ पातळीवर कारवाईबाबत वेगाने हालचाली सुरू झाल्या होत्या.

माझ्याविरोधात वरिष्ठांनी मिळून बनावट तक्रारी केलेल्या आहेत. त्याची चौकशी पोलिसांमार्फत सुरू आहे. हे माझ्या विरोधात रचलेले षड्‌‍यंत्र आहे.

- श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news