Pune drunk driving Cases: शहरात 13 हजार 888 मद्यपींवर कारवाईचा बडगा

नऊ महिन्यांत तीन हजार 948 मद्यपींवर कारवाई
Pune drunk driving Cases
शहरात 13 हजार 888 मद्यपींवर कारवाईचा बडगाPudhari
Published on
Updated on

पुणे: दारूच्या नशेत गाडीच्या स्टेअरिंगवर बसलेला चालक म्हणजे चालता-बोलता अपघात. पुण्यात 2020 ते 2025 या काळात तब्बल 13,888 मद्यपींवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तरीही रस्त्यांवर रोज जीवघेणी शर्यत सुरूच आहे.

न्यायालयाने नुकतेच दोन जणांना 15 दिवसांची कैद आणि दंड ठोठावत थेट तुरुंगात पाठविण्याची शिक्षा दिली आहे. मागील काही वर्षांत ड्रंंक ॲण्ड ड्राईव्हच्या कारवाईस वेग आला आहे. 2020 मध्ये 2017 असलेल्या कारवाईच्या प्रकरणात 2024 मध्ये पाच हजार 293 इतकी झाली. म्हणजेच कारवाईचा वेग 162 टक्क्यांनी वाढला. (Latest Pune News)

Pune drunk driving Cases
Road Repair Cost: रस्ते खोदाईमुळे दोषदायित्व कालावधी संपुष्टात! महापालिकेवर दुरुस्तीच्या खर्चाचा भार

2025 मध्ये फक्त नऊ महिन्यांतच (दि. 22 सप्टेंबरपर्यंत) तीन हजार 948 वाहनचालक मद्यपान करून वाहन चालविताना पकडले गेले. प्रत्येक दिवशी दारूच्या नशेत शेकडो चालक रस्त्यावर उतरतात आणि स्वतःसह इतरांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे कारवाई वरून अधोरेखित झाले आहे.

न्यायालयीन कारवाईत दोघांना तुरुंगवास

खडकी वाहतूक विभागाने पकडलेल्या रोहित शैलेंद्र वर्मा (वय 29, रा. पिंपळे गुरव) या युवकाविरुद्ध दाखल प्रकरणाची सोमवारी (दि. 22 सप्टेंबर) सुनावणी झाली. मोटार वाहन न्यायालयातील न्यायाधीश एस. बी. पाटील यांनी त्याला दोषी ठरवत 15 दिवसांची साधी कैद आणि तब्बल 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

तर नांदेड सिटी वाहतूक विभागाने पकडलेल्या राजकुमार मंगिणी कुलाळ (वय 31, रा. मंगलभैरव सोसायटी, नांदेड सिटी) यालाही न्यायालयाने दोषी ठरवले. त्यालाही 15 दिवसांची साधी कैद आणि 10 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी न्यायालयात खटला लढवला, तर पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला आणि उपनिरीक्षक विकास पाटील यांनी पुरावे सादर करत दोघांना शिक्षेपर्यंत पोहचविले.

2020 ते 2025 मधील ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची आकडेवारी

  • 2020 : 61 प्रकरणे

  • 2021 : 396 प्रकरणे

  • 2022 : 3961 प्रकरणे

  • 2023 : 3652 प्रकरणे

  • 2024 : 4233 प्रकरणे

  • 2025 (22 सप्टेंबरपर्यंत) : 3948 प्रकरणे

Pune drunk driving Cases
Bandu Andekar Gang: बंडू आंदेकर टोळीने उकळली 12 वर्षांत 20 कोटींची खंडणी; ‌‘प्रोटेक्शन मनी‌’चा दर वाचून बसेल धक्का

एकूण - 13,888 प्रकरणात वर्षात 13 हजार 888 मद्यपींवर कारवाईचा बडगा चालू वर्षात 3 हजार 948 जणांवर कारवाई नुकतेच ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह प्रकरणात दोघांना शिक्षा दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध आमचा कारवाईचा बडगा कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मद्यप्राषण करून वाहने चालवू नये. तसेच, वाहतुकीचे नियम मोडू नये.

- हिंमत जाधव, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news