मांडवगण फराटा येथील अतिक्रमणांवर कारवाई

मांडवगण फराटा येथील अतिक्रमणांवर कारवाई

Published on

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात पाडण्यात आली. यात पिंपळसुटी रस्ता ते बाभुळसर रस्त्याच्या दुतर्फा ग्रामपंचायतीने दिलेल्या दुकानांचा समावेश होता. या कारवाईत वीसपेक्षा जास्त दुकाने तोडण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी येथील माऊली मंदिर ते वरदविनायक हॉस्पिटल दरम्यान सुमारे पाच कोटी रुपयांचा सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र रस्त्याचे काही काम तसेच गटर लाईनचे काम अर्धवट अवस्थेत होते. गटर लाईनचे काम अपूर्ण असल्याने घरांमध्ये पाणी शिरत होते. गटार लाईनचे काम करण्यासाठी अतिक्रमणे काढणे आवश्यक असल्याने ग्रामपंचायतीने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक संदीप यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. काही दुकानदारांनी या कारवाईस विरोध दर्शविला. परंतु, कारवाई पूर्ण करण्यात आली. अतिक्रमण काढल्याने गटारलाईनचे काम सुरु होणार आहे.

याबाबत बोलताना सरपंच समीक्षा कुरूमकर फराटे पाटील म्हणाल्या की, अतिक्रमणामुळे गटारलाईनच्या कामासाठी मोठा अडथळा निर्माण होत होता. म्हणून हे अतिक्रमणे काढण्यात आले आहे. माजी सरपंच लतिका जगताप म्हणाल्या, सर्वसामान्य टपरीधारकांवर कारवाई केली आहे. सगळ्यांवर कारवाई न करता मोजक्या टपर्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शेजारी जुनी टाकी आहे ती देखील पाडणे आवश्यक आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news