पुणे : खराडीत भाजी विक्रेत्यांवर कारवाई

पुणे : खराडीत भाजी विक्रेत्यांवर कारवाई
Published on
Updated on

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : खराडी येथे रस्त्यावर बसणार्‍या अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाई केली. दै. 'पुढारी'ने याबाबतचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध केले होते. त्यानंतर नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांनी सांगितले की, सूर्यप्रकाशनगर येथील गुरुविस्ता सोसायटीकडे जाणार्‍या रस्त्यावर बसणार्‍या भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. यामुळे भाजी विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्या हातगाड्या आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे.

यापूर्वी कारवाईस टाळाटाळ केल्याबद्दल मंडई विभागाचे निरीक्षक मोहन बागूल व आरोग्य निरीक्षक अब्बासाली मंद्रुपकर यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. योग्य तो खुलासा वेळेत न केल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
सूर्यप्रकाशनगरमधील सोसायटीकडे जाणार्‍या रस्त्यावर विक्रेते बसवू नये आणि वाहनचालकांनी देखील वाहने पार्क करू नयेत; अन्यथा पुन्हा कारवाई केली जाईल, अशी ताकीद संबंधितांना देण्यात आली आहे. महालक्ष्मी लॉन्सजवळील भाजी विक्रेते व इन ऑरबिट मॉलजवळील पथारी व्यावसायिकांवर देखील कारवाई करण्यात आल्याचे बनकर यांनी सांगितले. दरम्यान, भाजी विक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त करीत दै. 'पुढारी'चे आभार मानले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news