पुणे : गुटखा माफियांविरोधात कारवाई ; एकाच दिवशी तब्बल 25 ठिकाणी छापे

File photo
File photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील अवैध गुटखा माफियांविरुद्ध पोलिसांनी आक्रमक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी एकाच दिवशी शहराच्या विविध भागांत तब्बल 25 ठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. यामुळे गुटखा व्यावसायिक आणि विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गुटखा विक्री केल्याप्रकरणी 25 जणांना अटक करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शासनाने प्रतिबंध केलेल्या तंबाखूजन्य पदार्थामध्ये गुटखा विक्रीस बंदी घातली आहे. यामुळे महाराष्ट्रात गुटखा विक्री करता येत नाही. असे असताना अनेक पान टपर्‍या, किराणा मालाची दुकाने येथे सर्रास गुटख्याची विक्री करण्यात येते. तर काही ठिकाणी खुला किंवा दोन मिश्रणे एकत्र करून माव्याच्या नावाखाली गुटखा विकला जातो. गुटख्याने मुखाचा कर्करोग व इतर विकार होत असल्याची जनजागृती शासन मोठ्या प्रमाणात करत आहे. तरीही गुटख्याची मागणी कमी होताना दिसत नाही. ग्राहक विक्रेत्यांकडून अवैध मार्गाने दाम दुप्पट रक्कम देऊन गुटखा खरेदी करत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सर्व पोलिस ठाण्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत 25 ठिकाणी छापे टाकून 25 जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पानटपरी, स्नॅक सेंटर आणि किराणामाल दुकानांवर करण्यात आली.

या ठिकाणी केली गेली कारवाई

फरासखाना पोलिस ठाणे, शमीम मोहमंद हनीफ बागवान, पान टपरी, बुधवार पेठ 3124 रुपयांचा गुटखा जप्त.

डेक्कन धनराज घोरपडे आणि प्रवीण खोपकर यशराज पानटपरी आणि संतोष पानटपरी 8072 रुपयांचा पानमसाला व गुटखा.

शिवाजीनगर बबलु मिश्रा, नंदकुमार बेंद्रे, रमेश सामलेटी, अनिश साळुंखे एलआयसी लेन, शिवाजीनगर 5515 रुपयांचा पानमसाला व गुटखा.

समर्थ आरोपी तांबोळी, साकीर अन्सारी एडी कॅम्प चौक 20950 रुपयांचा गुटखा.

सहकारनगर कुमार हातेकर दादा स्नॅक सेंटर 1320 रुपयांचा गुटखा.

भारती विद्यापीठ काळुलाल उणेचा हनुमान सुपार मार्केट 14950 रुपयांचा पानमसाला व गुटखा.

भारती विद्यापीठ अण्णासाहेब मिटकरी कात्रज कोंढवा रस्ता 29298 रुपयांचा भेसळयुक्त गुटखा.

दत्तवाडी महंमदरफीक सय्यद हजरत जनरल स्टोअर्स 3121 तंबाखूजन्य पदार्थ.

वारजे इंद्रजीत राऊत शिवकमल पान शॉप 7380 गुटखा व पानमसाला.

उत्तमनगर रमाकांत प्रजापती व राजेश पोखरणा प्लेझर ट्रो पान शॉप 71616 रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ.स कोथरूड राम बहादूर गुप्ता उजवी भुसारी कॉलसी 7550 रुपयांचा गुटखा

सिंहगड मनोज कुमार आर एस पान शॉप 14439 रुपयांचा गुटखा.

चतुश्रृंगी गणेश मंजुळकर गणेश बेकरी अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स 24994 रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ.

चंदननगर सलमान शेख सलमान पान शॉप 7800 रुपयांचा पानमसाला.

चंदननगर जमीर शेख जमीर पान शॉप 2504 रुपयांचा पानमसाला.

चंदननगर उबेदउल्ला शेख रॉयल टी शॉप 2580 रुपयांचा पानमसाला.

विमानतळ मुकेश गुप्ता जय भोले पान शॉप 10728 रुपयांचा पानमसाला.

विमानतळ राहुल ठोकळ राहुल पान शॉप 9687 रुपयांचा पानमसाला.

येरवडा अब्दुल मेकर्ला आयटी पार्क शेजारी 10038 रुपयांचा सिगरेट व गुटखा.

विश्रांतवाडी कबीर अब्बास समई हॉटेल 10252 रुपयांचा गुटखा.

मुंढवा संतोष इंगवले प्रतीक एंटरप्रायजेस 10901 रु.सिगरेट व गुटखा.

मुंढवा सोहनलाल चौधरी लक्ष्मी सुपर मार्केट 5990 चा पानमसाला.

लोणी काळभोर मातोश्री पान टपरी 930 रुपयांचा पानमसाला.

हडपसर संतोष थेऊरकर जी मॉल टपरी 10809 रुपयांचा पानमसाला.

हडपसर उमाशंकर गुप्ता शुक्ला पान शॉप 2717 रुपयांचा पानमसाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news