आळंदीतील 25 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

आळंदीतील 25 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : जून महिन्याच्या अखेर आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा व मुंबई येथील होर्डिंग दुर्घटनेची गंभीर दखल घेत आळंदीतील 25 अनधिकृत होर्डिंग भुईसपाट करण्यात आले. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या आदेशाने अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही कारवाई केली.

नगरपरिषदेची कारवाई

आळंदी नगरपरिषद अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख सचिन गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली मागील 8 दिवसांपासून शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याची नगरपरिषदेची कारवाई सुरू आहे. जमिनीवर असणार्‍या होर्डिंग क्रेनच्या साहाय्याने व घरावर असणारे होर्डिंग गॅसकटरने काढण्यात आले. या वेळी नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या.

या कारवाईत अरुण घुंडरे, सोमनाथ वैरागे, माऊली सोळंखे, राहुल सोळंखे, उद्धव मते, दिग्विजय तौर यांनी परिश्रम घेतले. पावसाळा, वादळी वारे विचारात घेता अजस्त्र आकाराचे उंच लोखंडी होर्डिंग काढून टाकण्याच्या नगरपरिषदेच्या कारवाईचे आळंदीकरांकडून स्वागत करण्यात आले.

अनधिकृत बांधकामे, रस्त्यावरील अतिक्रमण रडारवर

येत्या महिनाभरात शहरातील रस्त्यांवर करण्यात आलेले अतिक्रमण व बांधकामे नगरपरिषदेने हटविण्याचा निर्णय घेतला आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी विशेष अतिक्रमण पथक स्थापन करीत ही कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी केंद्रे यांनी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news