Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी दुर्घटना! मातीचा ढिगारा कोसळला; ४ ते ५ जण अडकल्याची भीती

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या वाढीव कामादरम्यान इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे मातीचा मोठा ढिगारा कोसळला.
Pune Solapur Highway Accident
Pune Solapur Highway AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. महामार्गाच्या वाढीव कामादरम्यान मातीचा मोठा ढिगारा अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे ही घटना घडली. या ढिगाऱ्याखाली चार ते पाच जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याच कामादरम्यान बिजवडी परिसरात मातीचा मोठा ढिगारा अचानक कोसळला. ढिगारा कोसळल्यामुळे कामाच्या ठिकाणी असलेल्या काही व्यक्ती त्याखाली दबल्या गेल्याची शक्यता आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कामगारांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune Solapur Highway Accident
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण! आता खरेदी करावी की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?

दोघांना बाहेर काढण्यात यश

मातीचा ढिगारा कोसळल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले. या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, आणखी तीन जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pune Solapur Highway Accident
Aamne Saamne Marathi Natak: 'आमने-सामने' नाटकात मोठा बदल! रोहन-केतकीच्या जागी दोन नव्या कलाकारांची एन्ट्री; कोण आहेत नवे चेहरे?

अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू

घटनेनंतर परिसरात मदतीसाठी नागरिकांची गर्दी झाली आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अडकलेल्या व्यक्तींना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या दुर्घटनेत नेमके किती जण अडकले आहेत आणि किती जण जखमी झाले आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, महामार्गाच्या कामादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोठ्या प्रमाणावर मातीचे ढिगारे असताना आवश्यक ती खबरदारी घेतली जात होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.