हडपसर येथील उड्डाणपुलावर अपघात

हडपसर येथील उड्डाणपुलावर अपघात

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  रात्रीच्या वेळेस हडपसर उड्डाणपुलावर जात असताना दुभाजक न दिसल्याने कंटेनर त्यावर धडकला. त्यामुळे कंटेनरमध्ये असलेले अती जड लोखंडी पाइप पुढे केबिनवर सरकले आणि कंटेनर उलटून यात केबिनमधील चालक गंभीर जखमी झाला असून, नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी (दि. 24) रात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या वेळी वाहतूक कोंडी झाली होती. हनुमंत लक्ष्मण सानप ( वय 42, सौताडा ता. पाटोदा, जि. बीड ) असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी रविकांत दादासाहेब कचरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी सांगितले, की गुरुवारी पहाटे तीन वाजता लोखंडी पाइप घेऊन कंटेनर ( एनएल 01, एई 8189 ) सोलापूर रोडच्या दिशेने जात होता. कंटेनर वैभव थिएटरच्या समोर आला असता, चालकाला हडपसर उड्डाणपुलाचा दुभाजक न दिसल्याने कंटेनर दुभाजकाला धडकला. यात चालक गंभीर जखमी झाला. तिथून जाणार्‍या इतर वाहनांच्या चालकांनी कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी क्रेनच्या साह्याने कंटेनर व लोखंडी पाइप बाजूला केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news