

रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मोठ्या प्रमाणात प्रवाशी घेऊन जाणारे वाहन म्हणजे एस.टी.बस आहे. घाटातील अरुंद रस्ते व सुरक्षिततेबाबत उपाययोजना नसल्याने वाहनांचे वारंवार अपघात घडतात. मात्र, तरीही रस्ते विकास महामंडळाकडून उपाययोजना केली जात नाही. स्थानिक ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावून घेण्याची गरज आहे. त्याशिवाय रस्ते विकास महामंडळाला जाग येणार नाही.
रफीक शेख, चेअरमन, वि.वि.सेवा सह. सोसायटी, कुरकुंभघटनेचा वृत्तांत मला आलेला नाही. त्यामुळे मी आता काहीच सांगू शकत नाही. वृत्तांत मिळवल्यानंतर अपघाताबाबत सांगेल.
विलास गावडे,दौंड आगार व्यवस्थापक