Accident News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर; दोन अपघातांत तिघांचा मृत्यू

Accident News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर; दोन अपघातांत तिघांचा मृत्यू
Published on
Updated on

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्याजवळील टाकवे गावच्या हद्दीत भरधाव वेगात जाणार्‍या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती मार्गालगतच्या खड्ड्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. 28) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास झाला. तर, दुसर्‍या एका अपघातात एका मोटार रायडर्सचा टेम्पोच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला.

बबन राघू सुतार (वय 50, रा. वडगाव मावळ), आर्यन ज्ञानेश्वर भालेकर (वय 10, रा. जाधववाडी, नवलाख उंबरे, ता. मावळ ) अशी कारमधील अपघातातील तर चिन्मय राहुल वैद्य (वय 20, रा. चैतन्यनगर, लोंढेवाडा, कोथरुड, पुणे) असे मोटारसायकल व टेम्पोच्या अपघातात मृत्यू झालेल्या बाईक रायडर्सचे नाव आहे. मयूर ज्ञानेश्वर पंडीत (वय 26, रा. मळवली, ता. मावळ), कारचालक प्रवीण नागू लोहार (वय 34, रा. पवळेवाडी, मावळ, सध्या रा. मळवली, ता. मावळ), राकेश बाबासाहेब सोनवणे (वय 21, रा. भाजे, ता. मावळ) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी मयूर ज्ञानेश्वर पंडीत (वय 26, रा. मळवली, ता. मावळ) यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक प्रवीण नागू लोहार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन सुतार, आर्यन भालेकर व कारचालक प्रवीण लोहार हे त्यांचे काही मित्रांसोबत कारने कार्ला फाटा येथून पुण्याकडे जात होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news