

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर शहरात घडणार्या रस्ते अपघातांच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आता पावले उचलली आहेत. शहरातून जाणार्या जुना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून ऊस वाहतुकीसह अवजड वाहतुकीला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तशा आशयाचे फलक बाह्यवळणावर लावण्यात आले आहेत. इंदापूर महाविद्यालय ते बसस्थानक परिसरात करण्यात येत असलेल्या बेशिस्त दुचाकी पार्किंगवर पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. एवढ्यावरच न थांबता शहरातून होणारी जीवघेणी ऊस वाहतूक बंद करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी पावले उचलली आहेत.
शहरातून जाणा-या जुन्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून आता ऊस वाहतुकीसह अवजड वाहतुकीला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. प्रवेशबंदी करीत असल्याचे फलक पोलिसांनी बाह्यवळणावरील वीरश्री मालोजीराजे भोसले चौक आणि महात्मा फुले चौकात लावले आहेत. अपघातांच्या घटना रोखण्यासाठी केवळ पोलिस विभागाने पावले उचलून चालणार नाही, तर इंदापूर नगरपरिषदेनेदेखील कार्यतत्परता दाखवण्याची गरज आहे. शहरातून होणारी अवजड व जीवघेणी वाहतूक बंद करण्यासाठी नगरपरिषदेने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
हेही वाचा :