

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात माझा जॉब गेला, त्यावेळी मला उपजीविका भागविण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. यावेळी मित्राने मला रॅपिडोबाबत सांगितले. त्यामुळे मला हे काम करताना आर्थिक मदत मिळाली, असे रॅपिडो कॅप्टन गिरीश मातापूरकर सांगत होता. पत्रकार परिषदेत रॅपिडो कॅप्टन प्रशांत जाधव म्हणाले, माझी आर्थिक स्थिती खालावलेली होती. आईलाही कॅन्सर आहे.
काही महिन्यांपूर्वी रॅपिडोमुळे माझी आर्थिक स्थिती चांगली होत होती. आता आरटीओच्या कारवाया सुरू असल्यामुळे रॅपिडो बंद आहे. अन् माझी आर्थिक स्थिती देखील खालावली आहे. आता मला कोण मदत करणार? रॅपिडो कॅप्टन भुजंग जाधव म्हणाले, माझी छोटीशी मोबाईल शॉपी आहे. ग्राहक कमी असल्याने दुकानाचे भाडे भरणे मुश्कील झाले होते. आता मी पार्टटाईम रॅपिडो सेवा पुरवितो. त्यामुळे माझ्या दुकानाचे भाडे मला भागविता येते.