

Boy ended his life due to study tension
पुणे: भोपाळ येथील एम्स रुग्णालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या बीड येथील एका तरुणाने पुण्यातील वानवडी परिसरात स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. उत्कर्ष हिंगणे (वय 18) असे त्याचे नाव आहे. त्याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची प्राथामिक माहिती आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हॉट्सअॅपवरती सुसाईड नोट लिहली असून, त्यामध्ये आपण आत्महत्या का करत आहे याचे कारण सांगितले आहे.
पंचरत्न हाऊसिंग सोसायटी फातिमा नगर वानवडी येथे एक मुलगा गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये आढळून आला आहे. त्याने व्हाट्सअपवर आत्महत्या करत असल्याचे पोस्ट टाकली आहे. सोमवारी सकाळी सव्वाहा वाजताच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबतचा कॉल होता. त्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हा प्रकार समोर आला. (Latest Pune News)
याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने यांनी सांगितले, उत्कर्ष हा मुळचा बीड जिल्ह्यातील आहे. भोपाळ येथील एम्स रुग्णालयामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. एका वैद्यकीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने तो पुण्यात आला होता. अभ्यासाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.याबाबतची सुसाईड नोट देखील पोलिसांना मिळून आली आहे.