येवलेवाडीत खड्ड्यांत झाडे लावून अनोखा निषेध !

येवलेवाडीत खड्ड्यांत झाडे लावून अनोखा निषेध !

कोंढवा : पुढारी वृत्तसेवा : येवलेवाडी चौक ते बोपदेव घाटमार्गावरील रस्त्याबाबत नागरिकांनी वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत अद्यापही कार्यवाही झालेली नाही. प्रशासन लोकांना मूर्ख समजत आहे का? असा सवाल उपस्थित करीत पश्चिम महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी येत्या आठ दिवसांत या रस्त्याचे काम न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

येवलेवाडी चौक ते बोपदेव घाटमार्गावरील रस्त्याची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. याविरोधात येवलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात खड्ड्यांमध्ये झाडे लावून अनोखे आंदोलन करण्यात आले. जालिंदर कामठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी उपसरपंच दादासाहेब कामठे, संदीप धांडेकर, संजय शेंडकर, विजय धांडेकर, मच्छिंद्र धांडेकर, उत्तम जावीर, देवराम देवकाते, बापू गुंजाळ यांच्यासह येवलेवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या परिसरात महाविद्यालये आहेत. सासवड मार्गाने ये-जा करणारे शेतकरी याच रस्त्याचा वापर करातात. मात्र, या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. नागरिक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

-जालिंदर कामठे,अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र भाजप

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news