भोर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भोर शहराध्यक्षासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील जिजाई बंगला येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री विजय शिवतारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तसेच माजी नगरसेवक यशवंत डाळ, अनंतराव थोपटे यांचे कार्यकर्ते असलेल्या जिल्हा दूध संघाचे संचालक दिलीप थोपटे यांचे पुतणे आणि अनंत दूधचे कार्यकारी संचालक नितिन थोपटे, काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सोमनाथ ढवळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप शेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत बाठे, भोलावडे गावचे सरपंच प्रवीण जगदाळे, बाळासो खुटवड, गजानन आवाळे आदी उपस्थित होते. यामुळे भोर शहरासह वीसगाव खोऱ्यात याचा परिणाम होईल, अशी परिस्थिती आहे.
हेही वाचा