पिंपरी : चिखली येथे नवीन पदपथ उखडला

पिंपरी : चिखली येथे नवीन पदपथ उखडला

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  चिखली-जाधववाडी येथे नव्याने बनविण्यात आलेला पदपथ केबल टाकण्यासाठी उखडण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना पदपथाचा वापर करता येत नाही. शहरात विकास कामांमध्ये नवीन पदपथ बसविण्यात आले आहेत. मात्र, नवीन पदपथ बसविल्यानंतर लगेच केबल वाहिनी किंवा अन्य कामासाठी नव्या कोरे पदपथ उखडण्यात येत आहेत. त्यामुळे नवीन तयार केलेल्या पदपथांची दुरवस्था तरच होतेच, पण नागरिकांच्या पैशाचीही उधळपट्टी होत आहे.

वारंवार उखडण्यात आलेल्या पदपथांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. कधी टपरी व पथारीवाल्यांचे अतिक्रमण तर कधी इतर कामांसाठी उखडण्यात आलेले पदपथ यामुळे नागरिकांना चालायचे कुठून, असा प्रश्न पडत आहे. अशा कामांमुळे नागरिकांना रस्त्यावरून वाहनांमधून चालावे लागते. यासाठी पदपथांवरील कामे लवकरात लवकर करून पदपथ चालण्यासाठी मोकळे करावेत, अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news