

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उद्योजक शिवाजी काळे यांच्या यशामागे प्रचंड कष्ट आहे. या सर्व बाबींचा मी साक्षीदार असल्याचे उद्गार राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज येथे केले. पिंपळोली येथे निशिगंधा जल महल बुटीक रिसॉर्टचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्याचे माजी मंत्री दत्तात्रय भरणे, पार्थ पवार, सुनेत्रा पवार, शिवाजी काळे, निर्मला काळे, गंधाली काळे, तनय गोसावी, शिवाजी काळे मित्रपरिवार, विठ्ठलशेठ मणियार, प्रशासकीय अधिकारी विजय देशमुख, अकुंश काकडे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबात शिवाजी काळे यांचा जन्म झाला. त्यांच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला. मात्र, चांगले मित्र मिळाल्यामुळे या संघर्षावर मात करीत शिवा यशस्वी झाला. त्यांच्या यशामागे प्रचंड कष्ट असतात, याची मला पूर्ण कल्पना आहे. कोणतीही गोष्ट करीत असताना त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन आसतो. अनेकांना संधी मिळत असते. मात्र, त्याचे सोने त्यांना करता येत नाही. शिवाजी काळे यांनी मात्र मिळालेल्या संधीचे सोने केल्याचे पाहायला मिळत आहे. काळे कुटुंबीयांच्या यशामध्ये निमावहिनी यांच्याबरोबर दोन्ही मुली गंधाली आणि शिवानी यांचा देखील मोठा वाटा आहे.
वालचंदनगरला चकरा कशासाठी ?
शिवाजी काळे यांची सासरवाडी वालचंदनगर आहे. लग्नाअगोदर या ठिकाणी निमावहिनींना पाहण्यासाठी ते वारंवार चकरा मारत असल्याचा किस्सा अजित पवार यांनी सांगितल्यानंतर कार्यक्रमामध्ये एकच हशा पिकला.