सिताराम लांडगे
लोणी काळभोर : येथील पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्याची बदली झाल्यानंतर दबंगगिरीची चर्चा असते. परंतु लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सध्या 'गुडविल 'ची खमंग चर्चा सुरू आहे, तर अनेकांना 'बॅडफिल' चे धक्के बसत आहेत. 'गुडविल', 'बॅडफिल' च्या नादात येथील जनतेला वाली राहीला का नाही हा सध्या हवेली तालुक्यातील चर्चेचा मोठा विषय ठरत आहे.
सरकार बदलल्यानंतर बदली सत्र सुरू झाले. मुदतीपुर्वी अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या या बदल्यात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात नवीन अधिकारी आल्यानंतर राजा पेक्षा सैन्याचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात सुरू झाला 'प्रोटोकॉल' पहील्याच महीन्यात वसुल करण्याच्या बहाण्याने 'गुडविल 'फॅक्टर' सुरू झाला. यात अनेकांना 'बॅडफिल' चे धक्के सहन करावे लागत आहेत.
हे धक्के सहनही होत नाही आणी बोलताही येत नाही. 'गुडविल' पाळले नाही तर खोट्या गुन्ह्याची धमकी, त्यात जबर मारहाण झालेला अन्याय कोणाला सांगताही येईना अशा 'बॅडफिल' अवस्थेत पुर्व हवेली तालुक्यातील जनता आहे, असा अन्याय सहन करणाऱ्या जनतेला तालुक्याचे लोकप्रतिनिधींनी न्याय द्यावा अशी मागणी तालुक्यात होऊ लागली आहे.