Pune News: फार्महाऊसचे गुपित कुणाच्या छत्रछायेखाली? प्रशासनाचे दुर्लक्ष

मुळशी, मावळ, खडकवासला, पानशेतकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
Pune News
फार्महाऊसचे गुपित कुणाच्या छत्रछायेखाली?Pudhari
Published on
Updated on

दिगंबर दराडे

पुणे: मुळशी, मावळ, खडकवासला, पानशेत, भोर, वेल्हे परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर फार्महाऊसचे बांधकाम झाले आहे. या बांधकामांसाठी संबंधित प्राधिकरणांची परवानगी आवश्यक असताना अनेक ठिकाणी ती न घेता अनधिकृतपणे बांधकामे करण्यात आली आहेत.

अशा बेकायदेशीर फार्महाऊसवर मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यात अमली पदार्थांचे सेवन, ध्वनिप्रदूषण आणि सार्वजनिक शांततेचा भंग होतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. (Latest Pune News)

Pune News
पालेभाज्यांनी गाठली चाळिशी; अवकाळी पावसामुळे भाज्यांचा दर्जा घसरला

प्रशासन आणि पोलिस यंत्रणेकडून कारवाईचा दावा केला जात असला, तरी अनेक ठिकाणी ही फार्म हाऊस अक्षरशः अभय मिळाल्यासारखी चालूच आहेत. यामागे स्थानिक राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासनातील काही अधिकार्‍यांचे दुर्लक्ष असल्याची शंका नागरिक व्यक्त करत आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करून अनधिकृत बांधकामे पाडण्याची आणि अशा फार्म हाऊसवर होणार्‍या बेकायदेशीर कार्यवाहीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

उदंड पार्ट्यांना वाढती गर्दी

पुणे शहरालगत पानशेत, खडकवासला या निसर्गरम्य भागांत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर फार्म हाऊसेस उभी राहिली आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक फार्म हाऊसकडे कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ‘रेव्ह’ पार्टीसारख्या ‘उंदड’ पार्ट्यांचे आयोजन होत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.

Pune News
मुठा कालव्यावर अतिक्रमणे केलेल्यांची खैर नाही; मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांची माहिती

अशा पार्टींमध्ये नशा, संगीत आणि अनिर्बंध मौजमजेला उधाण आलेले असते. काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली असली तरी अनेकवेळा याकडे दुर्लक्षच झाले आहे. जिल्हा प्रशासन आणि पीएमआरडीए यांची भूमिका केवळ कागदोपत्री वाटते.

कोणतीही परवानगी नसलेल्या बांधकामांना मोकळा सूट देण्यात आली असून, संभाव्य दुर्घटनांबाबत जबाबदारी कोणाची, हा प्रश्न उपस्थित होत आहे. निसर्गाच्या सान्निध्यातील हे फार्म हाऊस अनधिकृत असूनही तिथे उघडपणे पार्ट्या चालतात, यावर प्रशासनाचे लक्ष वेधले जात असून, कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

‘त्या’ फार्महाऊसवर कारवाई का नाही?

पिंपरी चिंचवडमधील चिखली येथील नदीपात्रातील तब्बल 36 फार्महाऊस पाडण्यात आली. मात्र अद्याप मुळशी, मावळ, आणि खडकवासला परिसरातील फार्महाऊसला अभय मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. हजारो फार्महाऊस या परिसरात उभारली जात आहेत. पुणे-मुंबई दोन्ही शहरातील लोकांसाठी जवळचे व प्रचंड निसर्गरम्य तालुके म्हणून मावळ-मुळशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस बांधकामे झाली आहेत. फिल्म इंडस्ट्रीतील सिनेस्टार, अनेक बडे नेते, राजकारणी, अधिकारी यांची याच मावळ-मुळशी तालुक्यात फार्म हाऊस झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news