पुणे : रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

पुणे : रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा

रुग्णवाहिकेत रुग्ण नसतानाही भरधाव वेगाने निघालेल्या रुग्णवाहिकेची धडक लागून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना वारूळवाडी गावच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर हॉटेल निलायम समोर घडली. काजल किशोर टाव्हरे (वय २७, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) असे या अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत हयगयीने गाडीने चालवून महिलेस धडक देणाऱ्या रुग्णवाहिका चालक रमेश सुखदेव पानसरे (रा. वैद्यवाडा, बुधवार पेठ, जुन्नर) याला नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. शिवाजी राजू शिंदे (वय ३९ रा शुभम विश्व सोसायटी,आनंदवाडी, वारूळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ९) रात्री ८.२० च्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर वारूळवाडी हद्दीत हॉटेल निलायम समोर काजल टाव्हरे या स्कुटी मोटरसायकल (एमएच १४ एफडब्लू ४९३४) वरून जात असताना १०८ नंबरची कोणतेही रुग्ण नसलेली रुग्णवाहिका (एमएच १४ सीएल ०८२०) पुण्याकडून नारायणगावकडे येत होती. यावरील चालक रमेश पानसरे याने नियमाकडे दुर्लक्ष करून हयगयीने, भरधाव वेगात चालवून काजल यांना धडक दिली. या अपघातात काजल यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास महिला पोलीस हवालदार घोडे करत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news