Pune | मैत्रिणींसोबत घरी पार्टी केल्यानंतर मुलीने जीवन संपवले

मैत्रीण बेशुद्धावस्थेत आढ‍ळली
The accused ended his life in the custody of Varora Police Station
पुणे : मैत्रिणींसोबत घरी पार्टी केल्यानंतर मुलीने जीवन संपवले.File Photo
Published on
Updated on

पुणे : येरवडा भागात एका १६ वर्षीय मुलीने मैत्रिणींसोबत घरी पार्टी केली. पार्टीनंतर तिने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जीवन संपवलेल्या मुलीसोबत असलेली मैत्रीण बेशुद्धावस्थेत आढळून आली आहे. सध्या तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

The accused ended his life in the custody of Varora Police Station
झेडपी ल. पा.चा जलसंधारणात भ्रष्टाचार : जयकुमार गोरे

दरम्यान, कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांनी केलेल्या मद्य पार्टीचे प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार समोर आला आहे.

मुलीच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा येरवडा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. तनिषा शांताराम मनोरे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मद्य पार्टीत आणखी एक १६ वर्षीय मुलगी अतिमद्यसेवनामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिषा येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात राहयला आहे. ती एका महाविद्यालयात अकरावीत शिकत होती. तिची आई भाजी विक्रीचा व्यवसाय करते. सोमवारी (दि. १५ जुलै) सायंकाळी दोन मैत्रिणींनी तनिषाच्या घरी मद्य पार्टी केली.

तनिषाच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाला तनिषाच्या मैत्रिणीने फोन करून रात्री आठच्या सुमारास बोलावून घेतले. त्यानंतर मुलगा घरी आला. त्याने घरात डोकावून पाहिले, तेव्हा तनिषाने गळफास घेतला असल्याचे उघडकीस आले. त्याने तनिषाला खाली उतरवले. चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याने तनिषाच्या आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तनिषाला रुग्णालयात दाखल केले.

The accused ended his life in the custody of Varora Police Station
भारतीय न्याय संहिते' अंतर्गत पणजीत पहिला गुन्हा नोंद

उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. या वेळी तनिषाची मैत्रीणदेखील बेशुद्धावस्थेत सापडली. तिला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ती मद्याच्या नशेत असल्याचे लक्षात आले. तिच्या आई- वडिलांनी तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी पाहणी केली असता तनिषा आणि मैत्रिणींनी मद्य पार्टी केल्याचे उघडकीस आले. मद्य पार्टीनंतर त्यांनी उलट्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पार्टीत दोघींना नशा झाली होती. तिची मैत्रीण बेशुद्ध पडली. तनिषाने आत्महत्या का केली, तसेच तिने कधी गळफास घेतला, याबाबतची माहिती समजू शकली नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news