First case registered in Panaji under New Penal Code nyaya sanhita
भारतीय न्याय संहिते' अंतर्गत पणजीत पहिला गुन्हा नोंद File Photo

भारतीय न्याय संहिते' अंतर्गत पणजीत पहिला गुन्हा नोंद

भारतीय न्याय संहिते' अंतर्गत पणजीत पहिला गुन्हा नोंद

पणजी : प्रभाकर धुरी

'भारतीय न्याय संहिते' च्या कलम २८५ मधील तरतुदीनुसार अडथळा आणल्याप्रकरणी उत्तर गोव्यात पणजी पोलिस स्थानकात पहिला गुन्हा नोंद झाला आहे. याच कलमाखाली देशात दिल्लीतही पहिला गुन्हा नोंद झाला आहे.

First case registered in Panaji under New Penal Code nyaya sanhita
NEET Reexam: नीट फेरपरीक्षेत एकाही विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण नाही

पणजी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अमीर तराल यांनी आज १ जुलै रोजी १२.१९ मिनिटांनी राज्याच्या वतीने भारतीय न्याय संहिता २८५ नुसार तक्रार नोंदवली.

First case registered in Panaji under New Penal Code nyaya sanhita
Lok Sabha, Rahul Gandhi and Modi|'अग्नीवीर'वरून लोकसभेत खडाजंगी

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आयनॉक्स थिएटरजवळ रस्त्याच्या कडेला निसार मकबुल बल्लारी, (वय ५३ वर्षे रा. चिंचोळे ताळगाव गोवा) हे जाणूनबुजून रस्त्याच्या कडेला मोकळ्या सार्वजनिक रस्त्यावर नारळ घेऊन जाणारी हातगाडी फिरवत असल्याचे आढळून आले होते. ज्यामुळे सामान्य लोकांची, प्रवाशांची गैरसोय होत होती. वाहतुकीलाही अडथळा होत होता. त्यामुळे नवीन कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महेश नाईक पुढील तपास करीत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news