पुणे : तब्बल 17 वर्षांपासून फरारी असणारा जेरबंद

पुणे : तब्बल 17 वर्षांपासून फरारी असणारा जेरबंद

मंचर : पुढारी वृत्तसेवा : गांजा तस्करप्रकरणी सतरा वर्षांपासून फरार संशयित गणेश उत्तम चव्हाण (वय 45) याला नेरळ (जि. रायगड) पोलिसांनी पारगाव पोलिसांच्या मदतीने गुरुवारी (दि.17) अटक केली आहे. गणेश चव्हाण (मूळ रा. जांभोरा, जि. औरंगाबाद ) हा आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत भराडी येथे राहत असल्याची माहिती नेरळ रायगड पोलिसांनी पारगाव पोलिसांना कळवली होती. याबाबत रायगड पोलीस पारगाव पोलीस ठाणे येथे आले होते. पारगाव व रायगड पोलिसांचे पथक संशयित राहत असलेल्या ठिकाणी त्यास अटक करण्यास गेले असता, तो घटनास्थळावरून पळून जाऊ लागला.

मात्र, पोलिसांनी 200 मीटर पळून त्याला ताब्यात घेतले. गणेश हा घर बांधकाम करण्याचे काम करीत असून, तो वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. पारगाव कारखाना पोलिस स्टेशन हद्दीत तीन ते चार दिवसांपूर्वी घर बांधकामासाठी तो आला होता. त्याला अटकेनंतर रायगड पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे. पारगावचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांना संपर्क करून त्यांचे व त्यांच्या स्टाफचे रायगड येथील कर्जत विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी लागरे यांनी कौतुक केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news